-
CENTRES
Progammes & Centres
Location
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने कितीही नियोजनपूर्ण आक्रमक पवित्रा घेतला तरी, त्यांना अद्याप आत्मविश्वास आणि युद्धकौशल्य यांच्याआधी बऱ्याच गोष्टी मिळवाव्या लागतील.
अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी ऑगस्टच्या सुरुवातीला दिलेली तैपेई भेट ही अनेक अर्थाने चर्चेचा विषय ठरली. या भेटीनंतर चीनने आक्रमक भूमिका घेतली आणि त्यांच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) तैवानच्या समुद्रधुनीमध्ये लष्करी कवायती केल्या. त्यातून त्यांनी ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’च्या लष्करी सामर्थ्याचे आक्रमक रूप दाखविण्याचा प्रयत्न केला. तैवानच्या मुख्य बेटाला घेरून, त्याच्या आसपासच्या सहा विभागांमध्ये चीनने हे सराव केले.
तैवानवरील आक्रमक पवित्रा सांभाळण्यासाठी चीनने तीन टप्प्यांमध्ये तयारी केली आहे. तैवानवर आक्रमण करण्यासाठी रोटरी आणि फिक्स्ड विंग लढाऊ विमानांचा समावेश असलेली ‘हवाई आक्रमण क्षमता’ यापैकी पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा हा क्षेपणास्त्र क्षमतेचा आहे. तर, तिसरा टप्पा हा चीनी लष्कराच्या संयुक्त ‘लॉजिस्टिक सपोर्ट फोर्स’चा (पीएलएजेएलएसएफ) आहे. या तीन्ही टप्प्यांचे तपशीलवार विश्लेषण कदाचित वेळखाऊ प्रक्रिया ठरू शकते, पण या कवायतीनंतर चीनी लष्कराची क्षमता काय आणि त्यांच्या त्रुटी काय आहेत, हे स्पष्ट होऊ शकते. चीनची पूर्वेकडील ‘ईस्टर्न थिएटर कमांड’ (ETC) हे तैवानवरील कोणत्याही संभाव्य आक्रमणाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी जबाबदार असले तरी, उत्तरेकडील ‘सदर्न थिएटर कमांड’ (STC) देखील या कवायतींसाठी सतर्क ठेवण्यात आली होती.
तैवानवरील आक्रमणांसाठी चीनी लष्कराचा पहिली पायरी ही त्यांच्या रोटरी आणि फिक्स्ड विंग लढाऊ विमानांच्या सज्जतेची आणि कारवायांची आहे. चीन लष्कराकडे असलेली अत्याधुनिक स्वरूपातील हेलिकॉप्टर ही अमेरिकेच्या तोडीस तोड आहेत. चीनी लष्कराने विविध छोट्या गटांमध्ये केलेल्या नव्या व्यापक पुनर्रचनेमुळे त्यांच्या रोटरी विंग लढाऊ विमानांसाठी सुयोग्य अशी परिस्थिती निर्माण करण्यात त्यांना यश आले आहे. जर तैवानवर ताबा मिळविण्याची वेळ आलीच, तर ही विमाने महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. चीनची ही एव्हिएशन ब्रिगेट त्यांच्या १३ सैन्यगटांपैकी प्रत्येकाचा भाग आहे. तसेच शिंजियांग आणि तिबेटमध्ये तैनात केल्या सैन्याचाही अविभाज्य भाग आहे.
याला दुसरा पर्याय म्हणून या एव्हिएशन ब्रिगेडचे जे रोटरी विंग पद्धतीच्या विमानांचे दळ आहे, त्यांच्या लढाऊ क्षमता या तैवानवरील संभाव्य आक्रमणांसाठी राखीव म्हणून ठेवल्या जाऊ शकतात. ही विमाने कमी प्रगत असल्याने ती नंतरच्या हल्ल्यासाठी रणभूमीवर आणली जाऊ शकतात. तैवानवरील थेट हल्ल्यासाठी चीनच्या दोन हवाई आक्रमण ब्रिगेड सज्ज आहेत. ७५ आणि ८३ व्या क्रमांकाच्या या ब्रिगेड्स दीर्घकाळ हवेत राहण्यासाठी समर्थ आहेत. हे जरी खरे असले तरी, एवढी क्षमता पुरेशी नहा. कारण कोणत्याही संभाव्य आक्रमणासाठी एकाच वेळी हवाई आणि जमिनीवरील, तसेच हवाई आणि समुद्रामधील कारवायांमध्ये समन्वय साधून लढावे लागेल. नुकत्याच झालेल्या कवायतींमध्ये चीनची ही क्षमता दिसलेली नाही. चीनची हवाई क्षमता वाढती आहे. त्यामुळे कदाचित पुढील दशकभरात कारवायांच्या आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून ते या क्षमतेपर्यंत पोहचू शकतील.
चीनची ही एव्हिएशन ब्रिगेट त्यांच्या १३ सैन्यगटांपैकी प्रत्येकाचा भाग आहे. तसेच शिंजियांग आणि तिबेटमध्ये तैनात केल्या सैन्याचाही अविभाज्य भाग आहे.
क्षेपणास्त्र क्षमता हे चीनी लष्कराची दुसरी ताकद आहे. ईटीसी या संस्थेच्या मते, चीनी लष्कराने मात्सू, वुकीऊ आणि डोंगयिन बेटांच्या परिसरात डोंग-फेंग (डीएफ) या प्रकारची अनेक लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागली. चीनी लष्कराचे हे क्षेपणास्त्र ब्रिगेड क्षेपणास्त्र हल्ल्यांचे समन्वय साधू शकतात आणि हल्ल्यानंतरच्या लढाईतील नुकसानीचे गणित बांधू शकतात का, याची चाचपणी करणे हा या चाचणीचा उद्देश होता. चीनी लष्कराने कदाचित या बेटांच्या क्षेपणास्त्र रडार ट्रॅकिंग क्षमतेचा अंदाज बांधत, तैवानच्या क्षेपणास्त्र संरक्षण क्षमतेबद्दल माहिती मिळवण्यासाठी हा उद्योग केला असावा.
याशिवाय, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या रॉकेट फोर्सने (पीएलएआरएफ) ज्या चाचण्या केल्या होत्या, त्यामुळे तैवानच्या संरक्षणाला हवाई आणि समन्वयात्मक हल्ल्याद्वारे कसे भेदता येईल, याचे देखील मूल्यांकन केले आहे. याद्वारे चीनी लष्कराने त्यांच्या विरोधकांना, विशेषतः अमेरिकन सैन्याला या कारवायांमधून आपल्या क्षेपणास्त्र क्षमतेबद्दलची चूणूक दाखविली आहे.
अखेरचा मुद्दा म्हणजे, चीनी लष्कराच्या संयुक्त ‘लॉजिस्टिक सपोर्ट फोर्स’चा (पीएलएजेएलएसएफ) आहे. त्यांचे ध्येय हे अचूक लॉजिस्टिक्सच्या हालचालींवर आहे. पण नुकत्याच झालेल्या कारवायांमध्ये या हालचालींची कोणतीच चाचणी करण्यात आलेली नाही. चीनी लष्कराची ही मुख्य कमजोरी आहे. लॉजिस्टिक्सच्या परिपूर्ण हालचालींशिवाय तैवानवर पूर्णपणे हल्ला करणे अशक्य आहे. समन्वय पद्धतीच्या हल्ल्यांसाठी चीनला अत्यंत विकसित अशी लॉजिस्टिक्स सिस्टिम असणे अत्यावश्यक आहे. चीनी लष्कर सध्या या कमकुवत भागावर काम करत आङे. ते एक असे नेटवर्क तयार करत आहेत, जे कमीत कमी वेळात प्रतिसाद देऊ शकेल. ज्यात वेग, अचूकता आणि कार्यक्षमता यांचा मेळ घातला जाईल. त्यांच्या ‘बेईडोऊ’ या सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टीमवर मोठ्या प्रमाणावर विसंबून, पीएलएजेएलएसएफ हे युद्धभूमीवर मोबाईल युनिट्सद्वारे संवाद आणि समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहे.
पण नुकत्याच झालेल्या कारवायांमध्ये या हालचालींची कोणतीच चाचणी करण्यात आलेली नाही. चीनी लष्कराची ही मुख्य कमजोरी आहे. लॉजिस्टिक्सच्या परिपूर्ण हालचालींशिवाय तैवानवर पूर्णपणे हल्ला करणे अशक्य आहे.
तैवान सामुद्रधुनीच्या पलिकडे कायमस्वरूपी आणि प्रभावी लष्करी मोहिमांसाठी पुरवठा, सक्षमीकरण, दुरुस्ती, विखुरलेल्या हवाई आणि समन्वयाने होणाऱ्या आक्रमणासाठी सज्जता मिळविणे हे चीनसाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी या युनिट्सना रणांगणातील परिस्थीनुसार निर्वासन आणि वैद्यकीय सहाय्यासाठी वेळेत पोहचण्यासाठी सुसज्ज करणे, यावर जोर द्यावा लागेल. सध्या चीनी लष्करामध्ये समन्वय पद्धतीने आक्रमण करणाऱ्या जहाजांची कमतरता आहे. तसेच अत्याधुनिक लॉजिस्टिक्स मिशन आणि लष्करी विमानांसाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचीही संख्या अपुरी आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला चीनने केलेल्या लष्करी कवायती हे केवळ त्यांच्या लष्करी सामर्थ्याचे काही प्रमाणातील दर्शन होते. चीनने कितीही प्रगती केली असली तरीही, तैवानवरील आक्रमणासाठी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने कितीही नियोजनपूर्ण आक्रमक पवित्रा घेतला तरी, त्यांना अद्याप आत्मविश्वास आणि युद्धकौशल्य यांच्याआधी बऱ्याच गोष्टी मिळवाव्या लागतील. तैवानच्या बाजूने असलेली अमेरिकेचा हस्तक्षेप ही चीनची डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत तैवानवर ताबा मिळविण्याचे चीनने कितीही ठरविले तरी ते त्यांना अवघड ठरू शकते. यासाठी प्रत्यक्ष कारवाई करण्याआधी चीनला या पद्धतीच्या अनेक कवायती कराव्या लागू शकतात. या कवायतींमधून या प्रदेशामध्ये जी परिस्थिती निर्माण होईल, त्यातून नवे प्रश्न निर्माण होतील ते प्रत्यक्ष कारवाईपेक्षा आणखीनच वेगळे आहेत.
हे भाष्य मूळतः द हिंदूमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Professor Harsh V. Pant is Vice President – Studies and Foreign Policy at Observer Research Foundation, New Delhi. He is a Professor of International Relations ...
Read More +Kartik Bommakanti is a Senior Fellow with the Strategic Studies Programme. Kartik specialises in space military issues and his research is primarily centred on the ...
Read More +