Author : Harsh V. Pant

Published on Dec 31, 2019 Commentaries 0 Hours ago

अमेरिकेतील ध्रुवीकरणामुळेच ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकले. म्हणूनच ध्रुवीकरणसदृश्य परिस्थितीत कसलाही बदल व्हावा यात ट्रम्प यांना रस नाही.

महाभियोगाआडून अमेरिकेत निवडणुकीची तयारी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा खटला चालवायला अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने नुकतीच मान्यता दिली. अशी नामुष्की ओढावलेले ट्रम्प हे अँड्र्यू जॉन्सन आणि बिल क्लिंटन यांच्यानंतरचे अमेरिकेचे केवळ तिसरेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. राजकीय फायद्यासाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर करणे आणि काँग्रेसला अक्षम करण्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर ठेवला आहे. खरे तर हे अपेक्षितच होते मात्र त्यामुळे होणाऱ्या राजकीय उलथापालथीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. खरे तर यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी २०२० मध्ये होत असलेल्या निवडणुकीची लढाई सुरु झाली आहे, असे निश्चितच म्हणता येईल.

आता ट्रम्प पदावरून पायउतार होतील की नाही हे आता सिनेटमध्येच ठरणार आहे. खरे तर महाभियोगाच्याआड राजकीय लढाईच सुरु असल्याचे निश्चितच म्हणता येईल. महत्वाचे म्हणजे ट्रम्प आणि त्यांच्या विरोधकांचा याची पूर्ण कल्पना आहे, आणि त्यानुसारच ते आपापली पावले उचलत आहेत. परिस्थितीकडे नीट पाहिले तर ट्रम्प पदावरून पायउतार होणार नाहीत, असेच चित्र आहे. मात्र अमेरिकी काँग्रेसच्या या तथाकथित शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून दोन्ही पक्ष, आपण या लढाईला गांभीर्याने घेतले असल्याचा संदेश आपापल्या समर्थकांपर्यंत पोहचवू पाहात आहेत.

महत्वाचे म्हणजे एकीकडे सभागृहात महाभियोगाविषयीची प्रक्रिया सुरु असतानाच, दुसरीकडे ट्रम्प हे निवडणुकीच्या रंगाणातले महत्वाचे राज्य असलेल्या मिशीगनमध्ये एका सभेला संबोधित करत होते. या सभेत ट्रम्प म्हणाले की :“एकीकडे आम्ही रोजगारनिर्मिती करत आहोत.आम्ही मिशीगनसाठी लढा देत असताना, काँग्रेसमधले कट्टरपंथी डाव्या विचारसरणीचे सदस्य मात्र द्वेष आणि मत्सरीवृत्ती दाखवत आहेत, नेमके काय घडते आहे हे आपण पाहातच आहात”

सिनेट ट्रम्प यांची महाभियातून सुटका करेल हे तसे स्पष्टच आहे. मात्र त्यानंतर ते अमेरिकेचा राजकीय साच्याला नेमके कशाप्रकारचे स्वरुप द्याचा प्रयत्न करतील हे मात्र अद्यापही तितकेसे स्पष्ट झालेले नाही.काहीच दिवसांपूर्वीट्रम्प यांनी सभागृहाच्या डेमोक्रेटिक अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांना उद्देशून एक खुले पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी पेलोसी यांनी “आपल्या पदाच्या शपथेचे उल्लंघन केले आहे” असा आरोप केला होता. त्यांची ही कृती म्हणजे “अमेरिकेच्या लोकशाहीविरुद्ध सरळ सरळ पुकारलेले युद्ध आहे ” असेही ट्रम्प यांनी या पत्रात लिहिले होते. या पत्रात ट्रम्प यीं लिहीले आहे की, :“तुमच्या या द्वेषमुलक कृत्यातून अमेरिकीची आजवरच्या जडणघडणीमागच्या तत्वांनाच नाकारण्याचा प्रयत्न दिसतो, इतकेच नाही तर तुमच्या या दुष्कृत्यामुळे अनेकांनी आपले आयुष्य वेचून निर्माण केलेली अमेरिकाच नष्ट करण्याचा करण्याचा धोका दिसतो आहे.”

बऱ्याचअंशी पक्षपाती वाटत असलेल्या महाभियोग प्रक्रियेमुळे अमेरिकेत राजकीय ध्रुवीकरण अधिक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे इतर कोणताही मधला मार्ग दिसण्याची शक्यताही धूसर होत चालली आहे. रिपब्लिकन्सचे सर्वच नेते हे पूर्णतः ट्रम्प यांचे पाठिराखे असल्यासारखेच वागत आहेत. अशा स्थितीत सिनेटमध्ये रिपब्लिकन्सला बहुमत असल्याने, ट्रम्प पदावरून पायउतार होणार नाहीत, हे रिपब्लिकन्स नक्कीच पाहतील.  ट्रम्प यांना पदावरून हटवण्यासाठी सिनेटच्या दोन तृतीयांश सदस्यांनी महाभियोग खटल्याच्या बाजुने मत द्यायला हवे. मात्र सिनेटमधले रिपब्लिकन्सचे असलेले बहुमत पाहता असे काही होण्याची शक्यता बिलकूल नाही हे अगदीच स्पष्ट आहे.

सिनेटमधले रिपब्लिकन्सचे नेते मीच मॅककोनेल यांनी हे स्पष्टच केले आहे की, सिनेटमध्ये चालणाऱ्या महाभियोगाच्या खटल्यात सिनेटमधले रिपब्लिकन्सचे सगळेच सदस्य “ट्रम्प यांना पूर्ण सहकार्य करतील”. थोडक्यात काय तर सनिटचे सदस्य खटल्याच्या काळात निःपक्षपातीपणे वागतील हे गृहीतकच इथे मोडून निघते.बऱ्याचअंशी पक्षपाती वाटत असलेल्या महाभियोग प्रक्रियेमुळे अमेरिकेत राजकीय ध्रुवीकरण अधिक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे इतर कोणताही मधला मार्ग दिसण्याची शक्यताही धूसर होत चालली आहे.

खरे तर सभागृहातदेखील ही फूट स्पष्टपणे दिसते. प्रतिनिधीगृहात जेव्हा डेमोक्रेट्स महाभियोगाविषयी चर्चा करत होते, त्यावेळी प्रतिनिधीगृहातले डेमोक्रेट्सचे अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी स्पष्ट वक्तव्य केले होते की, “जर का आपण आता कोणतीही कृती केली नाही, तर त्याचा अर्थ आपण आपल्या कर्तव्यापासून दूर जात आहोत असाच आहे.राष्ट्राध्यक्ष बेपर्वाइने करत असलेल्या कृती पाहता, त्यांच्याविरोधात महाभियोग चालवणे गरजेचे झाले आहे”. दुसरीकडे डेमोक्रॅट्स अन्यायकारक पद्धतीने आणि बेकादेशीररित्या चौकशी प्रक्रिया राबवत आहे असा आरोप प्रतिनिधीगृहातल्या रिपल्बिकन्सच्या सदस्यांनी केला आहे.

प्रतिनिधीगृहाच्या न्यायिक समितीचे सदस्य असलेल्या रिपब्लिकन्सचे नेते डग कॉलिन्स यांनी असे म्हटले की, “हा महाभियोग खटला केवळ अंदांज आणि अनुमानांवर चालवला जात आहे. हा महाभियोग खटला म्हणजे अमेरिकी नागरिकांना काय विकले जाऊ शकते याबाबतची सर्वेक्षण चाचणी घेतल्याप्रमाणे चालवला जात असेलेला खटला वाटतो आहे.”

यापरिस्थितीत अमेरिकेतल्या एकूण वातावरणाकडे तटस्थपणे पाहीले तर, महाभियोगाच्या खटल्याच्या प्रक्रियेमुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत अमेरिकी नागरिकांच्या मनात असलेल्या मतांवर फारसा प्रभाव पडल्याचे मात्र दिसत नाही. कारण ट्रम्प यांच्याविषयीची परस्पर भिन्न मते आजही तशीच कायम आहेत. याचे कारण सद्यस्थितीत अमेरिकेत मधला मार्ग उरला आहे किंवा असू शकतो असे चित्रच दिसत नाही. हे दोन्ही पक्ष आपल्या समर्थकांना काय हवे आहे त्यानुसार आजवर जसे वागत आले आहेत, तसेच आताही वागत आहेत. महाभियोगाचा खटला चालवावा ही डेमोक्रेटिक्सच्या समर्थकांची अनेक वर्षांची मागणी आहेआणि त्यामुळेच पेलोसी यांनी महाभियोगाच्या प्रक्रियेत समोर येणाऱ्या आव्हानांचा अंदाज घेऊन आधी टाळाटाळ करायचा प्रयत्न केला. नंतर मात्र त्यांना ही प्रक्रिया टाळता आली नाही हेच खरे.

आता रिपब्लिकन्सना असे वाटत आहे की, एकदा का ही महाभियोग खटल्याची प्रक्रिया संपली, की त्यानंतर या परिस्थितीला तोंड देणाऱ्या आपल्या राष्ट्राध्यक्षांच्यामागे त्यांचे समर्थक भक्कमपणे उभे राहती. त्यामुळे २०२० मध्ये नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या विजयाचा मार्ग सुकर करतील. ट्रम्प यांच्या समर्थकांसाठी महाभियोग खटल्याची ही प्रक्रिया म्हणजे, लोकशाहीमार्गाने निवडून आलेल्या सरकारला आणि पदावर आलेल्या ट्रम्प यांना हटवण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या कारस्थानांचाच एक भाग आहे.

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले, त्यावेळी अमेरिकेतला समाज आणि राजकीय वर्ग जितका दुभंगलेला होता, तितकाच तो आजही दुभंगलेला आहे. जर काही बदल झाला असेल तर तो इतकाच, की ध्रुवीकरण आता अधिकच वाढले आहे. अशा ध्रुवीकरणामुळेच ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकले हे वास्तव आहे. त्यामुळे ध्रुवीकरणसदृश्य दिसत असलेल्या परिस्थितीत कसलाही बदल व्हावा यात ट्रम्प यांना रस नाही. मात्र डेमोक्रेट्सदेखील अशाच प्रकारची खेळी करत आहेत, मात्र या संपूर्ण प्रक्रियेत त्यांना कोणताही वास्तववादी पर्याय देता आलेला नाही हे ही तितकेच खरे आहे.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक्सच्या वतीने उभे असलेले प्राथमिक उमेदवार पाहिले तर डेमोक्रेटिक्ससमोर असलेल्या आव्हानांची तीव्रता आपल्या लक्षात येऊ शकेल.२०२० सालची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकायची असेल तर डेमोक्रेटिक्सना अशा असंतुष्ट मतदारांना आपल्याकडे वळवावे लागेल, जे २०१६च्या निवडणुकीच्यावेळी रिपब्लिकन्सकडे वळले होते. महत्वाचे म्हणजे अशा मतदारांची संख्या ९ दलशलक्ष इतकी आहे. सातत्याने आपल्या मतप्रवाह बदलणारे अशी ओळख असलेल्या पेनसिल्व्हेनिया, मिशिगन आणि विस्कॉन्सिन या अमेरिकेतल्या राज्यांमधले मतदार ट्रम्प डेमोक्रेट्सकडे वळू देणार नाहीत.

महत्वाचे म्हणजे डेमोक्रेट्स ट्रम्प यांच्यावरच जितके अधिक लक्ष केंद्रीत करतील, तितकेच कमी ते अमेरिकेतल्या या महत्वाच्या राज्यांमधल्या कष्टकरी वर्गाच्या रोजगाराबद्दल बोलतील अशीच शक्यता आहे. त्यामुळेच एकीकडे सभागृहात महाभियोगाची प्रक्रिया सुरु असताना, ट्रम्प मात्र मिशिनगनमधल्या त्यांच्या मतदारसंघात असे बोलत होते की, “खरे तर आपल्यावर महाभियोग सुरु आहे, असे काही वाटतच नाही..”  खरे तर ही बाबही आश्चर्य वाटून घेण्यासारखी नाही.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.