Image Source: Getty
सध्या यंत्रणेच्या मुलभूत संरचनेमध्ये तंत्रज्ञानाचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. आधी निव्वळ साधन असलेले तंत्रज्ञान आता प्रेरक शक्ती बनून या यंत्रणा ज्या फ्रेमवर्कवर अवलंबून होत्या त्यातच बदल घडवून आणत आहेत. विविध प्रकारच्या आर्थिक मालमत्ता आणि प्लॅटफॉर्मवर अखंडित व्यवहार करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली युनिफाइड लेजर ही एक डिजिटल वित्तीय प्रणाली आहे. ही प्रणाली एका विकेंद्रित फ्रेमवर्कनुसार काम करते. यात सहभागींना विविध लेजर्ससोबत तसेच बँका, क्रिप्टो प्लॅटफॉर्म आणि पारंपारिक वित्तीय नेटवर्क यांसारख्या विविध वित्तीय प्रणालींमधील परस्पर व्यवहार करण्याची अनुमती मिळते. हे लेजर प्रगत क्रिप्टोग्राफीद्वारे पारदर्शकता, अंतिमता आणि सुरक्षितता प्रदान करून व्यवहारांची अखंडता सुनिश्चित करते.
विविध प्रकारच्या आर्थिक मालमत्ता आणि प्लॅटफॉर्मवर अखंडित व्यवहार करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली युनिफाइड लेजर ही एक डिजिटल वित्तीय प्रणाली आहे.
बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स (बीआयएस) च्या अलीकडील श्वेतपत्रिकेमध्ये इंटरनेटच्या संरचनेप्रमाणेच, परस्पर जोडलेल्या आर्थिक परिसंस्थांचे विकेंद्रित नेटवर्क तसेच व्यक्ती आणि व्यवसायांना त्याच्या केंद्रस्थानी ठेवणाऱ्या "फिन्टरनेट" ची कल्पना मांडण्यात आली आहे. फिन्टरनेटसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान या आधीच विकसित झाले असून त्यात वेगाने प्रगती होत आहे. याची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी, एक मजबूत नियामक आणि आर्थिक फ्रेमवर्क स्थापित करण्याची गरज आहे आणि यासाठी सरकार आणि खाजगी क्षेत्र यांच्यातील सहकार्य अत्यावश्यक आहे. हे सहकार्य सर्व प्रमुख भागधारकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक एकीकृत, सर्वसमावेशक आर्थिक परिसंस्था तयार करू शकते तसेच वित्ताचे लोकशाहीकरण आणि कार्यक्षमता वाढवू शकते.
सध्याची आव्हाने
दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झालेली असली तरी, व्यवस्थेमधील अकार्यक्षमतेचा मोठा परिणाम आर्थिक प्रणालीवर होत असल्याचे त्याच्या पुर्ण क्षमतांचा वापर अद्यापही झालेला नाही. रिटेल पेमेंट सिस्टम विकसित झाली असली व त्याचा वेग वाढला असला तरी शेअर्स आणि बाँड्स सारख्या मालमत्तांचा समावेश असलेल्या आर्थिक व्यवहारांच्या सेटलमेंटमध्ये बराच विलंब होत आहे. हा विलंब मुख्यत्वे आऊटडेटेड क्लिअरिंग, मेसेजिंग आणि सेटलमेंट सिस्टीम तसेच सायल्ड प्रोप्रायटरी डेटाबेसेस आणि विसंगत तांत्रिक मानकांमुळे होतो. यामुळे प्रक्रियेमध्ये अधिक विलंब होतो. याव्यतिरिक्त, अँटी-मनी लाँडरिंग नियमांशी संबंधित कंपलायन्स बर्डनमुळे अकार्यक्षमता आणखी वाढते. या संपुर्ण प्रक्रियेत वेळोवेळी ओळख सत्यापन आवश्यक असते. यामुळे कायदेशीर व्यवहारांमध्ये अनावश्यक जटिलता निर्माण होते.
यात कंपन्यांना अधिक रोख राखीव ठेवावी लागते किंवा वर्किंग कॅपिटलचे व्यवस्थापन करण्यासाठी महागड्या क्रेडिटवर अवलंबून राहावे लागते. तर व्यक्तींना वेतन मिळण्यास किंवा सरकारी हस्तांतरणास बराच विलंब होत असल्याने त्यांना उच्च व्याजाच्या कर्जावर अवलंबून राहावे लागते.
स्लो सेटलमेंट टाईम, उच्च व्यवहार खर्च आणि स्पर्धात्मक पर्यायांचा अभाव यांसारख्या बाबींमुळे व्यक्ती आणि व्यावसायिकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. यात कंपन्यांना अधिक रोख राखीव ठेवावी लागते किंवा वर्किंग कॅपिटलचे व्यवस्थापन करण्यासाठी महागड्या क्रेडिटवर अवलंबून राहावे लागते. तर व्यक्तींना वेतन मिळण्यास किंवा सरकारी हस्तांतरणास बराच विलंब होत असल्याने त्यांना उच्च व्याजाच्या कर्जावर अवलंबून राहावे लागते. कालबाह्य प्रणाली आणि मॅन्युअल प्रक्रियेमुळे ऑपरेशनल त्रुटी तसेच विलंबास सामोरे जावे लागते. त्यामुळे एकूण खर्चात वाढ होऊन कार्यक्षमता कमी होते. वर नमुद करण्यात आलेले मुद्दे कदाचित सर्वच देशांमध्ये भेडसावत असतील असे नाही परंतू जागतिक स्तरावर अनेक वित्तीय प्रणालींमधील सततच्या आव्हानांचे ते प्रतीक आहेत. या अकार्यक्षमतेमुळे जागतिक आर्थिक यंत्रणा ठप्प झाली आहे, असे सुचवणे चुकीचे आहे. तरीही या आव्हानांवर ठोस उपाय शोधणे ही काळाची गरज आहे.
युनिफाईड लेजर्स कशाप्रकारे काम करतात?
युनिफाइड लेजर ही एक अशी डिजिटल वित्तीय प्रणाली आहे जी अखंड इंटरऑपरेबिलिटी सुनिश्चित करून एकाधिक वित्तीय प्लॅटफॉर्मवर व्यवहार सुलभ करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. युनिफाइड लेजरमध्ये सर्व लेजर्समधील व्यवहारांची अखंडितता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. विश्वासार्ह वापरकर्ता ओळख, डिजिटल स्वाक्षरी आणि विविध प्लॅटफॉर्मवर ऑपरेट करण्याची क्षमता यासारख्या वैशिष्ट्यांसह, आर्थिक व्यवहारांमध्ये प्रवेशयोग्यता आणि सुरक्षितता या दोन्ही बाबी सुधारणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ही प्रणाली अनावश्यक ओळख पडताळणी आणि स्लो सेटलमेंट यांसारख्या पारंपारिक आर्थिक पायाभूत सुविधांमधील महत्त्वाच्या अकार्यक्षमतेकडे देखील लक्ष देते. शिवाय, युनिफाइड लेजर्स ही विविध नियामक मानके आणि संरक्षणांसह, रिअल इस्टेटपासून डिजिटल टोकन्सपर्यंत विविध प्रकारच्या मालमत्तांचे व्यवस्थापन करण्यास सक्षम आहेत. संपुर्ण प्रक्रिया सुव्यवस्थित करून आणि त्यातील प्रवेश वाढवून, या तंत्रज्ञानामध्ये वित्त क्षेत्रात बदल आणण्याची क्षमता आहे. असे केल्यामुळे अधिक समावेशक, कार्यक्षम आणि जागतिक मागण्यांशी जुळवून घेणे सुलभ होणार आहे.
फिन्टरनेटचे नियमन
युनिफाइड लेजर्ससह फिन्टरनेटच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी, सहभागींचे रक्षण आणि वित्तीय प्रणालीची अखंडता सुनिश्चित करण्यासाठी एक व्यापक कायदेशीर आणि नियामक फ्रेमवर्क तयार करणे आवश्यक आहे. अशाप्रकारचे उपाय न केल्यास फिन्टरनेटवरील ग्राहक, व्यवसाय आणि समाजाचा विश्वास कमी होण्याचा धोका संभवतो. युनिफाइड लेजर्समुळे नियामक त्रुटींमध्ये वाढ होत नाही याची खात्री करून, फिन्टरनेटमधील सहभागी आणि मालमत्ता कव्हर करण्यासाठी विद्यमान कायद्यांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. परंतू, युनिफाईड लेजर्समुळे काही नवी आव्हाने समोर आली आहेत. यात केंद्रीय बँका टोकनाईज्ड सेट्रल बँक मनी जारी करू शकतात का ? अशा प्रकारचे प्रश्न किंवा टोकनीकृत मालमत्तेचे वर्गीकरण आणि कर आकारणीमध्ये संदिग्धता यांचा समावेश आहे.
युनिफाइड लेजर्समुळे नियामक त्रुटींमध्ये वाढ होत नाही याची खात्री करून, फिन्टरनेटमधील सहभागी आणि मालमत्ता कव्हर करण्यासाठी विद्यमान कायद्यांमध्ये बदल करणे आवश्यक आहे.
टोकनाईज्ड असेट्सची अनन्य वैशिष्ट्ये सामावून घेण्यासाठी काही देशांना त्यांच्या कायदेशीर फ्रेमवर्कमध्ये कदाचित बदल करावा लागणार आहे. तर काही देशांना स्पर्धा आणि इंटरऑपरेबिलिटीला प्रोत्साहन देणारे नवीन नियम लागू करण्याची संधी मिळणार आहे. यात लेजरची मालकी आणि नियंत्रण, वित्तीय संस्थांची भूमिका आणि व्यवहार नियम यांच्याशी संबंधित प्रशासकीय समस्या देखील उद्भवण्याची शक्यता आहे.
युनिफाइड लेजरचे भविष्य काय आहे?
युनिफाइड लेजर सिस्टीममध्ये आर्थिक कार्यक्षमता आणि समावेशन सुधारण्यासाठीची महत्त्वपूर्ण क्षमता असली तरी त्याच्यामुळे आर्थिक स्थिरतेबाबत काही महत्त्वपूर्ण चिंता निर्माण होतात. अशा प्रणालीमध्ये जलद किंवा अनियंत्रित बदल हा आर्थिक व्यवस्थेच्या अखंडतेसाठी महत्त्वपूर्ण जोखीम निर्माण करू शकतो. केवळ तंत्रज्ञानामुळे आर्थिक व्यवस्थेवरील अविश्वास आणि प्रशासनामध्ये खोलवर रुजलेल्या समस्यांचे निराकरण होऊ शकते ही धारणा चुकीची असू शकते. केंद्रीय बँका आणि नियामक सध्या प्रदान करत असलेली जबाबदारी आणि देखरेख विकेंद्रीकरणामुळे अप्रभावी ठरू शकते. विकेंद्रित लेजर्स पारदर्शकता वाढवत असले तरी त्यांच्याकडे केंद्रीय अधिकार नसतो, त्यामुळे फसवणूक, बाजारातील फेरफार आणि प्रणालीगत जोखीम यांना प्रतिबंध करणे अधिक आव्हानात्मक होते. अशा प्रणालींचे नियमन करणे तुलनेने गुंतागुंतीचे असते म्हणूनच, यातील अपयशाची जबाबदारी स्पष्टपणे परिभाषित करणे आवश्यक आहे.
युनिफाइड लेजरच्या अंमलबजावणीसाठी वित्तीय प्रणालींना आधार देणारी कायदेशीर आणि नियामक फ्रेमवर्क विकसित होणे आवश्यक आहे. टोकनीकृत मालमत्तेची कायदेशीर स्थिती स्पष्ट न केल्यास आणि सीमापार व्यवहारांसाठी सातत्यपूर्ण नियमन न केल्यास एक खंडित नियामक वातावरण तयार होण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे जागतिक वित्तीय व्यवस्थेची स्थिरता खराब होऊ शकते. अशा मालमत्तेच्या नियामक उपचारांच्या सभोवतालची अनिश्चितता नियामक लवादाला आमंत्रण देऊ शकते. या परिस्थितीत काही समाजविरोधी घटक या नियामक विसंगतींचा फायदा घेण्याचा धोका संभवतो. अधिकारक्षेत्रांमध्ये वैधता आणि सुरक्षित व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी, मनी लाँडरिंग विरोधी आणि नो युअर कस्टमर (केवायसी) च्या मानकांचा समावेश असलेली, मजबूत फ्रेमवर्क स्थापित करणे आवश्यक आहे. कायदेशीर आणि नियामक लँडस्केपमध्ये विखंडन टाळण्यासाठी मध्यवर्ती बँका आणि वित्तीय नियामकांचे जागतिक समन्वय आवश्यक आहे.
यामुळे जागतिक वित्तीय व्यवस्थेची स्थिरता खराब होऊ शकते. अशा मालमत्तेच्या नियामक उपचारांच्या सभोवतालची अनिश्चितता नियामक लवादाला आमंत्रण देऊ शकते.
आंतरराष्ट्रीय नियामक संरेखनाची अनुपस्थिती प्रणालीगत स्थिरतेसाठी दीर्घकालीन धोके निर्माण करू शकते. युनिफाइड लेजर्समुळे कार्यक्षमतेत वाढ होत असली तरी सायबर सिक्युरिटीबाबत काही गंभीर धोकेही यामुळे संभवतात. जर अंतर्निहित तंत्रज्ञान अयशस्वी झाले किंवा सुरक्षेत तडजोड केली गेली तर त्यामुळे संपूर्ण आर्थिक व्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. याव्यतिरिक्त, ज्या प्रदेशामध्ये तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित स्वरूपात केला जातो किंवा अपुऱ्या डिजिटल साक्षरतेमुळे लोक आर्थिक व्यवस्थेत सहभागी होऊ शकत नाहीत. अशा प्रदेशात डिजिटल पायाभूत सुविधांवरील अधिक अवलंबनामुळे डिजिटल डिव्हाईडचा धोका वाढतो. त्यामुळे, शिक्षण, डिजिटल साक्षरता, आणि इंटरनेट प्रवेश अशा सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास होणे आवश्यक आहे. असे झाल्यास युनिफाइड लेजरच्या फायद्यांचा सर्वांना उपयोग होऊ शकेल.
वित्तीय प्रणालींमधील तांत्रिक प्रगतीमुळे कार्यक्षमता, सर्वसमावेशकता आणि लवचिकता प्राप्त करणे सुलभ झाले असले तरी या नवकल्पना प्रत्यक्षात उतरण्याआधी अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. वित्तपरिवर्तनासाठी युनिफाइड लेजरची क्षमता प्रभावी असली तरी भू-राजकीय तणाव आणि अशा प्रणाली लागू करण्यामागची राजकीय इच्छाशक्ती यामुळे महत्त्वपूर्ण अडथळे निर्माण होऊ शकतात. सरकार, नियामक आणि बहुपक्षीय संस्थांनी सार्वत्रिकपणे स्विकारार्ह फ्रेमवर्कसोबत संरेखन न केल्यामुळे जागतिक मानकीकरण साध्य करणे हे एक मोठे आव्हान आहे. यामुळे जलद अंमलबजावणीच्या व्यवहार्यतेबाबत शंका निर्माण होते. शिवाय, विविध प्रदेशामध्ये तंत्रज्ञानाच्या प्रवेशातील असमानतेमुळे या प्रणालीचा स्विकार करण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आलेले मुद्दे वैध असले तरी त्यांचा कोणत्याही प्रकारचा परिणाम जागतिक आर्थिक व्यवस्थेवर होणार नाही.
यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे या समस्येवर आपण उपाय शोधत आहोत कि या उपायामुळे समस्या निर्माण होणार आहेत? समस्येवरील उपायाकडे नकारात्मक पद्धतीने पाहणे योग्य नाही. नवीन तांत्रिक उपायांना बळकटी देणाऱ्या पारंपारिक पद्धतींना सक्रियपणे प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. या तंत्रज्ञानातील अंतर्निहित नवकल्पनांमध्ये एक अनिश्चित व महत्त्वाची क्षमता आहे, याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. चुकांमधून शिकत आणि सध्याच्या जगातील परिस्थितीला अनुसरून तसेच अपरिवर्तनशील मॉडेल्स किंवा सैद्धांतिक रचनांमध्ये न अडकता या प्रणालींना विकसित केले गेले तर त्यांचा सामाजिक आणि आर्थिक प्रभाव महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
सौरदीप बाग हे ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी आणि टेक्नॉलॉजीचे असोसिएट फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.