-
CENTRES
Progammes & Centres
Location
मर्यादित आर्थिक लाभांच्या शक्यतेनंतरही, युकेचे CPTPP मध्ये सामील होणे हे इंडो-पॅसिफिक प्रदेशासोबत त्याच्या अधिक सखोल रणनीतिक आणि आर्थिक संलग्नतेचे प्रतिबिंब आहे.
Image Source: Getty
15 डिसेंबर 2024 रोजी, युनायटेड किंगडम (UK) औपचारिकपणे कॉमप्रेहेंसिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह ॲग्रीमेंट फॉर ट्रान्स-पॅसिफिक पार्टनरशिप (CPTPP) करारात सामील झाले, ज्यामुळे त्यांनी पोस्ट-ब्रेक्सिट व्यापार धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला. पॅसिफिक क्षेत्रात पसरलेला CPTPP जगाच्या 11 सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांचा समावेश करतो आणि सदस्यांना अधिक बाजारपेठ प्रवेश देतो तसेच व्यापार टॅरिफ (आयात शुल्क) कमी करतो. जपान नंतर CPTPP मध्ये दुसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या आणि पहिल्या युरोपीय सदस्य म्हणून UK चा समावेश, हा CPTPP च्या जागतिक मुक्त व्यापार करार (FTA) म्हणून स्थितीला मजबुत करतो, ज्यामध्ये सदस्य देशांची एकूण GDP €12 ट्रिलियन आणि जागतिक उत्पादनाच्या 15 टक्क्यांचा समावेश आहे.
CPTPP हे युकेच्या स्वतंत्र धोरणाचे उदाहरण आहे, जे UK च्या व्यापार धोरणाला युरोपीय संघ (EU) च्या कथित बंधनांपासून बाह्य आकार देण्याच्या दृष्टिकोनातून आहे. ब्रेक्सिटनंतर एक वर्षाने, युकेने 2021 मध्ये CPTPP मध्ये सामील होण्यासाठी औपचारिकपणे अर्ज केला.
युकेचा या प्रदेशाकडे असणारा दृष्टिकोन व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी मिळवण्यावर आणि पुरवठा साखळी व आर्थिक संबंधांचे विविधीकरण करण्यावर आधारित आहे. या संदर्भात, ब्रिटनने या प्रदेशात आपले राजनैतिक आणि लष्करी संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
इंटिग्रेटेड रिव्ह्यू 2021, ब्रिटिश सरकारच्या मुख्य परराष्ट्र धोरणाचे दस्तऐवज, ग्लोबल ब्रिटनच्या महत्त्वाकांक्षेला अधोरेखित करतो, ज्याद्वारे युकेला एक खुला आणि बाह्यदृष्टीने पाहणारा भू-राजकीय देश म्हणून प्रदर्शित केले जाईल. इंडो-पॅसिफिककडे असणारा झुकाव हा या दृष्टीकोनाचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे, जो पूर्वेकडील जागतिक शक्तींच्या समीकरणाच्या गतीचा बदल दर्शवतो. युकेचा या प्रदेशाकडे असणारा दृष्टिकोन व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी मिळवण्यावर आणि पुरवठा साखळी व आर्थिक संबंधांचे विविधीकरण करण्यावर आधारित आहे. या संदर्भात, ब्रिटनने या प्रदेशात आपले राजनैतिक आणि लष्करी संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे, इंडो-पॅसिफिक देशांसोबत एफटीए करार केले आहेत आणि दक्षिण पूर्व आशिया (ASEAN) देशांचा डायलॉग पार्टनर बनला आहे.
आपल्या अद्ययावत इंटिग्रेटेड रिव्ह्यू रिफ्रेश 2023 मध्ये, सरकारने जोर देऊन सांगितले की, युरो-अटलांटिक आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रांची समृद्धी आणि सुरक्षा एकमेकांशी अतूटपणे जोडलेली आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशाच्या बाहेरील पहिला सदस्य म्हणून, युकेचा प्रवेश CPTPP ला एक जागतिक करार बनवतो. जो दोन्ही क्षेत्रांना जोडतो.
2050 पर्यंत जागतिक विकासात इंडो-पॅसिफिकचे योगदान 54 टक्के असेल आणि 2030 पर्यंत इथे जगातील अर्ध्ये उपभोक्ते असण्याची शक्यता आहे. युके सरकारनुसार, CPTPP हे देशाचे इंडो-पॅसिफिकमध्ये प्रवेशद्वार आहे, ज्याला ते अद्वितीय आर्थिक संधींनी भरलेला प्रदेश मानतात. त्यामुळे, युकेचा CPTPP मध्ये प्रवेश हे केवळ एक आर्थिक पाऊल नाही, तर इंडो-पॅसिफिकमध्ये त्यांचा प्रभाव आणि उपस्थिती वाढविण्यासाठी एक रणनीतिक निर्णय आहे.
यूके ट्रेड पॉलिसी ऑब्झर्व्हेटरी आणि ब्रिटिश चेंबर ऑफ कॉमर्सनुसार, CPTPP मध्ये सामील होणे फक्त व्यापाराला स्वाभाविकपणे वाढवणार नाही, परंतु हे लगातार वाढीसाठी एक अनुकूल वातावरण निर्माण करेल. युके सरकारच्या स्वत:च्या परिणाम मूल्यांकनानुसार, देशाच्या GDP मध्ये 10 वर्षांत फक्त 0.08 टक्क्यांची वाढ होईल, त्यासोबत CPTPP देशांसोबत द्विपक्षीय व्यापारात £4.9 अब्जांची साधारण वाढ होईल. हाऊस ऑफ लॉर्ड्स इंटरनॅशनल एग्रीमेंट्स कमिटीने मर्यादित आर्थिक फायदे सांगितले आहेत, कारण युकेचे आधीच CPTPP सदस्य देशांपैकी 11 पैकी 9 देशांसोबत द्विपक्षीय एफटीए आहेत (मुख्यत: पूर्वीच्या EU करारांचे). मलेशिया आणि ब्रुनेई हे दोन देश वगळले असले तरी, हे दोन्ही देश युकेच्या एकूण व्यापाराचा केवळ 0.33 टक्के भाग होतात.
येणाऱ्या काळात होणाऱ्या कराराच्या विस्तारामध्ये नवीन सदस्य देशांमध्ये, जसे की दक्षिण कोरिया, उरुग्वे आणि इक्वेडोर, समाविष्ट करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे युकेला लाभ होईल. CPTPP मध्ये सामील होणारा यूके हा पहिलाच गैर संस्थापक देश असणार आहे, ज्यामुळे नवीन देशांच्या प्रवेशाचे मार्ग खुले होतील.
तथापि, काही फायदे देखील संभवतात. 2022 मध्ये, CPTPP सदस्य देशांना युकेची निर्यात एकूण 64.7 अब्ज पाउंड किमतीची होती. (युकेच्या एकूण निर्यातीच्या 7.8 टक्के) होती, ज्यामध्ये व्हिस्की, कार, डेयरी आणि सेवा समाविष्ट आहेत. युकेच्या निर्यातीवरील 99.9 टक्के टॅरिफ कमी केल्यामुळे व्यापारामध्ये 3.3 अब्ज पाउंडने वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यामधून 1.7 अब्ज पाउंड निर्यातीवर आधारित आहेत. कराराच्या माध्यमातून, मलेशियातील स्कॉच व्हिस्कीवरील टॅरिफ 80 टक्क्यांपासून 0 टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल. तथापि, CPTPP सदस्य देशांना निर्यात होणाऱ्या इतर प्रमुख वस्तूंवर, जसे की यांत्रिकी, मौल्यवान धातू आणि मोटारी, विद्यमान टॅरिफ आधीच न्यूनतम आहेत. चिली, पेरू आणि मेक्सिको देखील या कराराचा भाग असल्यामुळे, युकेला लॅटिन अमेरिकेतील बाजारपेठांमध्ये चांगला प्रवेश मिळू शकतो, जिथे ऊर्जा आणि हवामानातील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले महत्त्वपूर्ण खनिजांचे मोठे साठे आहेत. येणाऱ्या काळात होणाऱ्या कराराच्या विस्तारामध्ये नवीन सदस्य देशांमध्ये, जसे की दक्षिण कोरिया, उरुग्वे आणि इक्वेडोर, समाविष्ट करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे युकेला लाभ होईल. CPTPP मध्ये सामील होणारा यूके हा पहिलाच गैर संस्थापक देश असणार आहे, ज्यामुळे नवीन देशांच्या प्रवेशाचे मार्ग खुले होतील.
ब्रिटन हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सेवा निर्यात करणारा देश आहे, 2022 मध्ये CPTPP सदस्य देशांना 32.2 अब्ज पाउंड किमतीच्या सेवा निर्यात केल्या आणि 2021 मध्ये 23 अब्ज पाउंड किमतीच्या केवळ डिजिटल सेवा निर्यात केल्या, परिणामी CPTPP सह त्याचा सेवा व्यापारात 5 अब्ज पाउंडचा अधिशेष आहे. CTPTPP सदस्यता युकेच्या इंडो-पॅसिफिकमधील सहभागाचा मुख्य आधारस्तंभ म्हणून डिजिटल व्यापार आणि सेवा यांना उंचावण्याची अपेक्षा आहे. हा करार डिजिटल व्यापारात क्रांती घडवतो, डेटा प्रवाह सुलभ करणे, डेटा स्थानिकरणाच्या नियमांना मर्यादा घालणे आणि स्रोत कोडचे अनिवार्य प्रकटीकरण बंद करणे यास प्रोत्साहन देतो. हे युकेच्या राष्ट्रीय डेटा धोरणाशी सुसंगत आहे, ज्याचा उद्देश डेटाच्या आंतरराष्ट्रीय प्रवाहाला प्रोत्साहन देणे आहे.
तसेच, लघु आणि मध्यम उद्योग (SMEs) युकेतील 99.9 टक्के व्यवसायांचा भाग आहेत आणि 16.64 दशलक्ष लोकांना रोजगार देतात, त्यामुळे CPTPP मध्ये SMEs साठी एक विशेष उपसंलग्न आहे, जे नियामक पारदर्शकता सुनिश्चित करते आणि प्रक्रिया सुलभ करते, तसेच संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी अनेक तरतुदी आहेत. ओरिजिनचे नियम (रुल्स ऑफ ओरिजिन - ROOs) इन्पुट पुरवठा वाढवतील आणि पुरवठा साखळी एकात्मिक करण्यास मदत करतील. उदाहरणार्थ, एक युके कंपनी जपानला यांत्रिकी उपकरणे निर्यात करू शकते, ज्यात ऑस्ट्रेलियातून इन्पुट्स वापरले जातात. ROOs युकेच्या ऑटोमोबाईल उद्योग आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांसाठी फायदेशीर ठरू शकतात, कारण युके सध्या CPTPP देशांकडून अनेक इलेक्ट्रिक वाहनांचे घटक आयात करतो, पण पूर्ण झालेल्या वस्तूंचा निर्यात मात्र कमी करतो.
ब्रेक्सिटनंतरच्या युकेच्या व्यापार धोरणाला आर्थिक आणि व्यापार हितांच्या अतिरिक्त सार्वभौमत्वाच्या कल्पनांनी मार्गदर्शन केले आहे. या संदर्भात, एकसारख्या नियमांची अंमलबजावणी करण्याऐवजी, CPTPP फ्रेमवर्क सदस्यांदरम्यान साइड लेटर्सच्या (असा करार जो मुख्य कराराच्या अटींमध्ये फेरबदल करतो किंवा त्यास मदत करतो) देवाणघेवाणीला अनुमती देते, ज्यामुळे नियमांमध्ये विशिष्ट अपवाद लागू करता येतात. उदाहरणार्थ, ब्रिटनने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसोबत साइड लेटर्सवर स्वाक्षरी केली होती, ज्यामुळे इन्व्हेस्टर-स्टेट डिस्प्यूट सेटलमेंट (ISDS) लागू होणार नाही.
ROOs युकेच्या ऑटोमोबाईल उद्योग आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांसाठी फायदेशीर ठरू शकतात, कारण युके सध्या CPTPP देशांकडून अनेक इलेक्ट्रिक वाहनांचे घटक आयात करतो, पण पूर्ण झालेल्या वस्तूंची निर्यात मात्र कमी करतो.
इंडो-पॅसिफिकमध्ये, CPTPP, रिजनल कॉमप्रेहेंसिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप (RCEP) शी स्पर्धा करते. CPTPP अधिक उच्च मानके सेट करते आणि नियमांची विस्तृत श्रेणी समाविष्ट करते, तर RCEP अधिक लवचिक दृष्टिकोन स्वीकारतो आणि कमी कठोर आवश्यकता असतात. CPTPP मध्ये डिजिटल व्यापार आणि कामगार कल्याण उपायांसाठी वाद निवारण यंत्रणांची मुभा आहे, जी RCEP मध्ये नाहीत. तथापि, हा करार याची हमी देतो की यूकेच्या गुंतवणूक पडताळणीच्या निर्णयांना CPTPP च्या वाद निवारण यंत्रणांद्वारे आव्हान केले जाऊ नयेत.
यूकेच्या CPTPP मध्ये सामील होण्यावर अनेक देशांतर्गत गटांनी टीका केली आहे. नॅशनल फार्मर्स युनियनने कमी नियामक मानकांसह परदेशी उत्पादनांमधून वाढलेल्या स्पर्धेविरुद्ध इशारा दिला, तर वर्ल्डवाइड फंड फॉर नेचरने म्हटले आहे की हा करार पर्यावरणीय नाशाला प्रोत्साहन देतो आणि यूकेमध्ये बंद केलेल्या कीटकनाशकांचा व्यापार प्रोत्साहित करतो. मजूर संघटनांनी कमजोर सुरक्षा उपाय आणि कमी खर्चाच्या परदेशी कामगारांकडून होणाऱ्या स्पर्धेवर चिंता व्यक्त केली आहे. नागरी समाज गटांना भीती आहे की कार्बन उत्सर्जनातील वाढामुळे जलवायू उद्दिष्टांना धोका निर्माण होऊ शकतो आणि मलेशियन पाम तेलावर टॅरिफ कमी करणे जंगलतोडला प्रोत्साहन देऊ शकते. तथापि, ट्रेड अँड ॲग्रीकल्चर कमिशनने म्हटले आहे की CPTPP यूकेच्या विद्यमान पर्यावरणीय सुरक्षा कायद्यांना बदलणार नाही, तर त्यांना मजबूत करेल.
देशांतर्गत विरोध असूनही, CPTPP मध्ये सामील होणे ब्रेक्झिट नंतरचा विजय म्हणून पाहिले जाऊ शकते, परंतु आर्थिक फायदे ब्रेक्झिटमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याची शक्यता नाही, कारण युरोपीय संघ (EU) यूकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून कायम आहे. दुसरीकडे, CPTPP गटासोबत यूकेचा व्यापार, जो अधिक भौतिक अंतरावर असल्याने, शक्यतो खूप कमी राहील. तरीही, करारामध्ये सदस्यत्व यूकेला वाढत्या संरक्षणवादी प्रवृत्तींनंतर जागतिक व्यापार संरचनेवर आपला ठसा ठेवण्याची संधी देते. अखेर, CPTPP मध्ये यूकेचे सामील होणे हे त्याच्या इंडो-पॅसिफिक सोबतच्या आणखी सखोल धोरणात्मक आणि आर्थिक सहभागाचे प्रतिबिंब आहे.
शायरी मल्होत्रा ह्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामच्या डेप्युटी डायरेक्टर आहेत.
जया औपलिश ह्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्राममध्ये रिसर्च इंटर्न आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Shairee Malhotra is Deputy Director - Strategic Studies Programme at the Observer Research Foundation. Her areas of work include Indian foreign policy with a focus on ...
Read More +Jayaa Auplish is a Research Intern at the Observer Research Foundation ...
Read More +