Expert Speak Raisina Debates
Published on Jun 19, 2024 Updated 0 Hours ago

TSAT-1A प्रक्षेपणाने अमेरिका-भारत संरक्षण विषयक अवकाश संबंधांचा विस्तार करण्याच्या संधी खुल्या झाल्या आहेत. मात्र, भारत- अमेरिकेमधील क्वांटम तंत्रज्ञान आणि AI मधील इतर तांत्रिक सहयोग विकसित होण्यास वेळ लागेल.

TSAT-1A द्वारे प्रगती झाली असली तरीही, अमेरिका-भारत यांच्यातील अंतराळ सहकार्यात आव्हाने अजूनही कायम

अवकाश सहकार्य हा अमेरिका-भारत द्विपक्षीय संबंधांतील प्रमुख घटक आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात अवकाश तंत्रज्ञान व आघाडीचे तंत्रज्ञान या संबंधांतील घनिष्ठ सहभागाबाबत आणि सहकार्याबाबत अनेक करार आहेत. या सहकार्याचे नवे रूप म्हणजे ‘क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज’ (आयसीइटी) बाबत घेण्यात आलेला पुढाकार, जो जानेवारी २०२३ मध्ये भारत- अमेरिका यांनी सुरू केला. त्याचा उद्देश अवकाश आणि दोन महत्त्वाची उदयोन्मुख तंत्रज्ञाने- आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम टेक्नॉलॉजी यांसह अनेक क्षेत्रांत सहकार्य वाढवणे हा होता. AI आणि QT सारख्या आघाडीच्या तंत्रज्ञानांना अधिक मजबूत संरक्षण सहकार्य मिळण्याकडे आवश्यक लक्ष मिळू शकते का आणि त्याकरता प्रयत्न करता येतील का, याचे मूल्यांकन करण्यासाठी iCET हा एक चांगला आधार आहे.

जरी AI आणि QT तंत्रज्ञानावरील सहयोगात्मक प्रतिबद्धता विशेषत: ‘डिफेन्स इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी कोऑपरेशन’ अथवा iCET अंतर्गत एसडीआर, यूएव्ही आणि सेन्सरचा भाग नाहीत. iCET एक नवीन ‘नाविन्यपूर्णतेचा पूल’ सांधण्याचे आवाहन करते, जे दोन देशांमधील संरक्षण विषयक स्टार्ट-अप्सना जोडते. यांतून उद्योन्मुख तंत्रज्ञानासंबंधातील सहकार्याच्या दृष्टीला मूर्त स्वरूप मिळते, ज्याकरता नव्या तंत्रज्ञानाची निर्मिती आणि नाविन्यपूर्णतेला चालना मिळणे आवश्यक आहे, परंतु ज्या विशिष्ट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे आणि उत्तमतेचे मानक पूर्ण करणे आवश्यक आहे, त्याबद्दल मौन धारण करण्यात आले आहे. मात्र, अमेरिका-भारत या दोन्ही देशांमध्ये संरक्षण उपयोजनांसाठी AI आणि QT सारख्या क्षेत्रांत सहकार्य वाढविण्यास पूर्वाधार आहे.

AI आणि QT सारख्या आघाडीच्या तंत्रज्ञानांना अधिक मजबूत संरक्षण सहकार्य मिळण्याबाबत आवश्यक लक्ष मिळू शकते का आणि त्याकरता प्रयत्न करता येतील का, याचे मूल्यांकन करण्यासाठी iCET हा एक चांगला आधार आहे.

अवकाश तंत्रज्ञान हे एक क्षेत्र आहे, जिथे अमेरिका आणि भारत यांच्यातील सहकार्य नागरी आणि व्यावसायिक उपयोजनांपुरते मर्यादित आहे.  याला अलीकडचा अपवाद म्हणजे नोव्हेंबर २०२३ मध्ये अमेरिकन कंपनी सॅटेलॉजिक आणि भारताची टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (TASL) यांच्यात झालेला करार. यामुळे एप्रिल २०२४ मध्ये केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेस एक्सच्या फाल्कन ९ रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आलेला TSAT-1A  विकसित झाला. TSAT-1A हा सब-मीटर रिझोल्यूशन इलेक्ट्रो-ऑप्टिकल अर्थ ऑब्झर्व्हेशन (EO) उपग्रह आहे, ज्याच्या प्रतिमा श्रेणीत गतिमान आहेत, उच्च संकलन क्षमता, ‘मल्टीस्पेक्ट्रल आणि हायपरस्पेक्ट्रल क्षमतांद्वारे कमी विलंब वितरण’ हे त्याचे वैशिष्ट्य आहे. सॅटेलॉजिक आणि TASL यांच्या पूरक क्षमतांमुळे TSAT-1A चा विकास, एकत्रीकरण आणि प्रक्षेपण शक्य झाले. अमेरिका स्थित कंपनीकडे ‘...प्रगत पृथ्वी निरीक्षण उपग्रह विकसित आणि एकत्रित करण्याची ताकद आणि TASL ची जटिल प्रणालीचे एकत्रीकरण करण्याची क्षमता’ आहे. कर्नाटकातील TASL च्या वेमागल सुविधेत असेंब्ली, इंटिग्रेशन आणि टेस्टिंग (AIT) पूर्ण करण्यात आले. सॅटेलॉजिक आणि TASL हे संरक्षणासाठी समर्पित स्पेस स्टार्ट-अप नाहीत. TASL ही टाटा सन्सची स्थापित उपकंपनी आहे आणि सॅटेलॉजिक ही १४ वर्षे जुनी कंपनी आहे. तरीही, iCET मध्ये सांगितल्यानुसार, अमेरिकेतील आणि भारतातील संरक्षण स्टार्ट-अप्स नावीन्यपूर्णतेद्वारे सहयोग कसा करू शकतात, याचे एक प्रारूप पेश करतात.

नमूद केल्यानुसार, TSAT 1-A अंतराळयानात हायपरस्पेक्ट्रल आणि मल्टीस्पेक्ट्रल पेलोड्स असतात, जे संरक्षणाकरता महत्त्वपूर्ण असतात. मल्टीस्पेक्ट्रल पेलोड्स मध्यम रिझोल्यूशनचा इमेजिंग डेटा कॅप्चर करतात, ज्यात जमिनीचा वापर, जमिनीच्या विशिष्ट क्षेत्राला व्यापणारे जंगलाचे प्रमाण, शेतीमधील उत्पादन पद्धती, जल संपदा आणि दिलेल्या क्षेत्रातील पर्यावरणीय स्थिती समाविष्ट आहे. संरक्षण उपयोजनांच्या दृष्टीने, मल्टीस्पेक्ट्रल पेलोड्स क्षेपणास्त्र तळ, आण्विक चाचणी जागा, हवाई तळ आणि इतर मोठ्या लष्करी छावण्यांवर इमेजिंग डेटा कॅप्चर करणारी इमेजरी इंटेलिजेंस (IMINT) निर्माण करतात. अमेरिकेचा ‘लँडसॅट’ आणि फ्रेंच ‘स्पॉट’ हे उपग्रह ‘मल्टीस्पेक्ट्रल इमेजरी’ प्रदान करतात, जे व्यावसायिकरित्या उपलब्ध आहेत आणि काही बाबतीत, अमेरिकेच्या संरक्षण विभागासारख्या अधिकृत संरक्षण संस्थांद्वारे अशा प्रकारे प्रतिमांचा संग्रह उपलब्ध होऊ शकतो. भारताचे संरक्षण मंत्रालय आणि सॅटेलाइट रिमोट सेन्सिंगशी संबंधित सरकारी संस्था- उदाहरणार्थ- डिफेन्स इमेज प्रोसेसिंग अँड ॲनालिसिस सेंटरने (DIPAC) परदेशातून IMINT प्राप्त केले आहे. हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह हे उच्च-रिझोल्यूशन इमेजिंग अवकाशयान आहेत. मल्टीस्पेक्ट्रल उपग्रहांप्रमाणे नाही, जे केवळ थोड्याशा स्पेक्ट्रल बँडमध्ये डेटाची प्रतिमा करू शकतात, तर हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह शेकडो ते हजारो बँडमध्ये उच्च-रिझोल्यूशन इमेजरी डेटा प्रदान करतात, ते इंद्रधनुष्यातील रंगांमधील प्रत्येक छटाशी संबंधित तपशीलवार डेटा उपलब्ध करून देऊ शकतात. प्रत्यक्षात, मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंग (MSI) प्रणाली आणि हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग (HSI) प्रणाली परस्परांना पूरक असतात आणि त्यांचे आंतरिक फायदे असतात. थोडक्यात, हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग प्रणालीचे अवकाशीय रिझोल्यूशन कमी असते, तर मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंग प्रणालीचे अवकाशीय रिझोल्यूशन जास्त असते. नेमक्या याच कारणास्तव TSAT-1A मध्ये हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सिस्टीम्स आणि मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंग सिस्टीम्स दोन्ही पेलोड्स असतात.

मल्टीस्पेक्ट्रल पेलोड्स मध्यम रिझोल्यूशनचा इमेजिंग डेटा कॅप्चर करतात, ज्यात जमिनीचा वापर, जमिनीच्या विशिष्ट क्षेत्राला व्यापणारे जंगलाचे प्रमाण, शेतीमधील उत्पादन पद्धती, जल संपदा आणि दिलेल्या क्षेत्रातील पर्यावरणीय स्थिती समाविष्ट आहे.

जरी TASL ने मल्टीस्पेक्ट्रल आणि हायपरस्पेक्ट्रल पेलोड्स विकसित करण्यात AIT आणि सॅटेलॉजिकमध्ये आपले प्रावीण्य सिद्ध केले असले तरी, AIT त प्रगत स्पेक्ट्रल फोटोग्राफीत क्षमता विकसित करणे आवश्यक आहे. हे अमेरिकास्थित स्टार्ट-अप आणि कंपन्यांसह किंवा भारत-स्थित स्टार्ट-अप आणि कंपन्यांच्या सहकार्याने केले जाऊ शकते. चीनच्या लष्करी तैनातीचा मागोवा घेण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरातील वर्गीकृत इमेजरी डेटा मिळविण्यासाठी अमेरिकेवर भारताचे जे अत्यधिक अवलंबित्व आहे, त्या पार्श्वभूमीवर नंतरची आवश्यकता अधिक निकडीची आहे. TSAT-1A केवळ अंशतः भारताच्या IMINT गरजा पूर्ण करण्यास उपयुक्त ठरतो. अशाच प्रकारच्या समान देवाणघेवाणीद्वारे, भारतीय खासगी संस्थेने भू-स्थानिक आणि इमेजिंग स्पेसक्राफ्ट विकसित करण्यात तांत्रिक प्रावीण्य प्राप्त केल्याने, भारतही उपग्रहाद्वारे-उत्पन्न IMINT अमेरिकेसोबत शेअर करू शकतो.

संरक्षणासाठी TSAT-1A पेलोड्स ज्या प्रमाणात लागू होतात, ते पाहता, दोन्ही देशांमधील संरक्षण-संबंधित अवकाश संबंधांचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मात्र,  संरक्षण स्टार्ट-अप्समधील सहयोगी उपक्रमांद्वारे तांत्रिक सहकार्याची इतर क्षेत्रे, विशेषत: QT आणि AI क्षेत्रात सहकार्याची प्रत्यक्ष सुरूवात होऊन त्याला निश्चित रूप धारण व्हायला वेळ लागेल. तरीही, सॅटेलॉजिक-टीएएसएल सहकार्याचे प्रयत्न दोन्ही देशांच्या खासगी क्षेत्रांमधील अधिक संयुक्त उपक्रमांसाठी एक प्रारूप म्हणून काम करतात, ज्याचा विस्तार QT आणि AI मधील संरक्षण-संबंधित संयुक्त उपक्रमांसाठी केला जाऊ शकतो.

अशा प्रकारे, संरक्षण उपयोजनांसह अमेरिका-भारत यांच्यात अवकाश विषयक सहकार्य विस्ताराच्या वाढत्या शक्यता आहेत आणि TSAT-1A प्रक्षेपण हे अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या पलीकडे विस्तारलेल्या अतिरिक्त सहकार्याचा पाया म्हणून काम करू शकते.


कार्तिक बोम्मकांती हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे वरिष्ठ फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.