हा लेख जागतिक लोकसंख्या दिन 2024 या मालिकेचा भाग आहे.
गेल्या दहा वर्षात वाढती लोकसंख्या, बदलते हवामान, कमी होणारे संसाधन आणि ग्राहकांच्या बदलत्या सवयी यामुळे शेती आणि अन्नधान्य क्षेत्रावर मोठा ताण पडला आहे. म्हणून टिकाऊ आणि स्वयंपूर्ण अन्नधान्य व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. यासाठी पोषण, सर्वांचा समावेश, टिकाऊपणा, पर्यावरणाची जपणूक आणि हवामानाचा विचार करणारी अन्नधान्य प्रणाली विकसित करण्याची गरज आहे. हे साध्य करण्यासाठी, डेटाच्या आधारे निर्णय घेण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि डेटाचा वापर करणे गरजेचे आहे. जागतिक अन्नधान्य व्यवस्थेचा आढावा घेतल्यावर असे दिसून येते की अन्न सुरक्षा, शेती आणि अन्नधान्याशी निगडीत इतर रोजगार, अन्नधान्य वाया जाणे, शेतीचा अर्थव्यवस्थेला होणारा फायदा, व्यवस्थापन आणि अन्नधान्य क्षेत्राची आत्मनिर्भरता यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी अधिक चांगल्या डेटाची तात्काळ गरज आहे.
आधुनिक तंत्रज्ञान आणि डेटाचा शेतीमध्ये वापर केल्याने उत्पादन वाढते, टिकाऊ पद्धती राबवणे सोपे होते आणि खर्च कमी होतो. उदाहरणार्थ, जमीन, हवामान यांची डेटा घेऊन पीक वाढवणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाणी आणि खतांचा योग्य वापर करण्यास मदत करते. त्यामुळे पीक वाया जाणे कमी होते आणि जमिनीचे नुकसानही टळते. याशिवाय, अन्नधान्य साठवण आणि वाहतुकीत सुधारणा करून अन्नधान्य वाया जाणे रोखता येते. अशा प्रकारे शेती टिकाऊ होते आणि पर्यावरणाचीही हानी कमी होते.
आधुनिक तंत्रज्ञान आणि डेटाचा शेतीमध्ये वापर केल्याने उत्पादन वाढते, टिकाऊ पद्धती राबवणे सोपे होते आणि खर्च कमी होतो. उदाहरणार्थ, जमीन, हवामान यांची डेटा घेऊन पीक वाढवणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाणी आणि खतांचा योग्य वापर करण्यास मदत करते.
आपल्या सर्वांच्या अन्नधान्य गरजा भागवण्यासाठी आणि शेतीमध्ये पर्यावरणाची, समाजाची आणि अर्थव्यवस्थेची काळजी घेण्यासाठी टिकाऊ शेती आणि अन्नधान्य प्रणाली आवश्यक आहे. डेटा सायन्स या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती अधिक कार्यक्षम करता येते आणि पर्यावरणाचे नुकसानही कमी होते. जमीन, हवामान यांसारच्या विविध स्त्रोतांकडून मिळणारा डेटा एकत्र करून डेटा सायन्स शेतकऱ्यांना पीक किती येईल याचा अंदाज घेण्यास, खर्च कमी करण्यास आणि अधिक चांगले पीक वाढवण्यास मदत करते.
आपल्या स्वयंपाकघरात येणारे पदार्थ शेतापासून कसे आले ते आधुनिक पद्धतीने शोधणे खूप फायदेशीर आहे. यामुळे अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षा राखणे सोपे होते. दूषित पदार्थ आढळल्यास त्याचा बाजारातून लगेच मागोवा काढता येतो. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांपासून मोठ्या दुकानांमध्ये भाज्यांचा प्रवास थेट तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत कसा होतोय हे 'ब्लॉकचेन'सारखी तंत्रज्ञानं दाखवतात. त्याचबरोबर, अन्नपदार्थांची गुणवत्ता, पोषण मूल्य आणि पॅकेजिंगचा डेटा मिळाल्याने आपण त्या अन्नावर विश्वास ठेवू शकतो. अन्नधान्य सुरक्षा म्हणजेच पुरेस अन्नधान्य उपलब्ध आहे ना याचा डेटा 'बिग डेटा' आणि 'मशीन लर्निंग' यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळवता येतो. उदाहरणार्थ, 'वर्ल्ड फूड प्रोग्राम' लोकांचा डेटा गोळा करून अन्नधान्य टंचाई असलेल्या भागाकडे लक्ष देते.
आधुनिक डेटाचा वापर करून शेती केल्याने छोट्या शेतकऱ्यांचे भले होते. हवामानानुसार पीक वाढवण्यासाठी आणि कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी त्यांना मदत मिळते. मोबाईलवर येणाऱ्या अॅप्सवरून हवामान, पीक डेटा, शेतीच्या नवीन पद्धती आणि रोगराईंबद्दल डेटा मिळवता येते. यामुळे पीक चांगले येते आणि खर्चही कमी होतो. शिवाय, शेतीच्या डेटाच्या व्यासपीठांमुळे बाजारपेठ मिळवणे सोपे होते आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होते. अॅग्री मार्केटप्लेस आणि फार्मक्राउडीसारख्या ऑनलाइन विक्रीच्या साइट्समुळे शेतीमाल थेट विकता येते आणि त्यांना चांगला नफा मिळतो. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आत्मनिर्भर बनू शकतो.
आधुनिक डेटाचा वापर करून शेती केल्याने छोट्या शेतकऱ्यांचे भले होते. हवामानानुसार पीक वाढवण्यासाठी आणि कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी त्यांना मदत मिळते.
शेती आणि अन्नधान्य क्षेत्रात डेटाचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांना फायदा होतो आणि नवनवीन तंत्रज्ञान तयार होण्यास मदत मिळते. या डेटाच्या आधारे, शेती संस्था आणि कंपन्या प्रयोग करू शकतात, हवामान आणि जमिनीच्या परिस्थितीनुसार पीक वाढवण्याचे मार्ग शोधू शकतात आणि नवीन सुधारणांचा शेतीवर होणारा परिणाम तपासू शकतात. पीक वाढ आणि टिकाऊपणा यांचा डेटा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांची निवड आणि जास्त उत्पादन देणाऱ्या, पोषण मूल्य असलेल्या नवीन जाती निवडण्यास मदत करते. याशिवाय, शेतकरी, संशोधक आणि सरकार यांच्यासारख्या विविध क्षेत्रातील लोकांची डेटाची देवाणघेवाण करणारी व्यासपीठं गुंतागुंतीच्या समस्यांवर मात करण्यासाठी मदत करतात. उदाहरणार्थ, 2023 मध्ये एफएओ (FAO) या संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘हार्वेस्टिंग चेंज’ या अहवालात असे म्हटले आहे की, "शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी आणि त्यांचा वापर वाढवण्यासाठी सोप्या वातावरणाची गरज आहे ज्यामुळे संपूर्ण अन्नधान व्यवस्थेला फायदा होईल.
शेती आणि अन्नधान क्षेत्रात डेटाचा वापर वाढवण्याचे भरपूर फायदे असले तरीही काही अडथळ्यांवर मात करणे गरजेचे आहे. डेटाची गुणवत्ता आणि त्याचे मानकीकरण हे सर्वात मोठे आव्हान आहे जे प्रभावी डेटा विश्लेषणास अडथळा आणते. त्यासाठी शेतकऱ्यांना डेटाबद्दल जागरूक करणे आणि डेटाचा वापर कसा करायचा याबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तसेच, डेटा गोळा करण्याचा खर्च कमी करण्यावर आणि शेतीमध्ये या डेटाचा वापर केल्यामुळे होणारा फायदा स्पष्टपणे दाखवण्यावर भर द्यावा. विकसनशील देशांमध्ये छोट्या शेतकऱ्यांना डेटा मिळवणे कठीण आहे. यावर मात करण्यासाठी 'डिजिटल डिवाइड' कमी करणे आणि तंत्रज्ञान वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अशा उपायांमुळे सर्व शेतकऱ्यांना समान संधी मिळेल आणि टिकाऊ शेतीला चालना मिळेल.
डेटाची गुणवत्ता आणि त्याचे मानकीकरण हे सर्वात मोठे आव्हान आहे जे प्रभावी डेटा विश्लेषणास अडथळा आणते. त्यासाठी शेतकऱ्यांना डेटाबद्दल जागरूक करणे आणि डेटाचा वापर कसा करायचा याबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तसेच, डेटा गोळा करण्याचा खर्च कमी करण्यावर आणि शेतीमध्ये या डेटाचा वापर केल्यामुळे होणारा फायदा स्पष्टपणे दाखवण्यावर भर द्यावा.
शेती आणि अन्नधान्य क्षेत्राचा विकास करण्यासाठी डेटाचा वापर खूप महत्वाचा आहे. डेटामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवणे सोपे होते, अन्नपदार्थांची गुणवत्ता राखता येते आणि उत्पादन वाढवता येते. शिवाय, टिकाऊ शेतीला चालना मिळते. डेटा विश्लेषणाच्या मदतीने हितसंबंधी लोकांना चांगले निर्णय घेता येतात आणि संसाधनांचा योग्य वापर करता येतो. या फायद्यांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी, सरकारने देश आणि त्याच्या खालील विभागांमध्ये डेटा गोळा करण्याच्या आणि आकडेवारी प्रणालीवर गुंतवणूक करणे गरजेचे आहे. यासोबतच, सर्व शेतकऱ्यांना समान संधी मिळवून देण्यासाठी समावेशी डेटा व्यवस्थापन (Data Governance) आणि डेटाचे सर्वांपर्यंत समान वाटप करणे आवश्यक आहे. शेती आणि अन्नधान क्षेत्रातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी सरकार, देणगीदार आणि खासगी संस्था यांच्यातील सहयोग वाढवणेही तितकेच महत्वाचे आहे. अशा सहकार्यामुळे डेटा व्यवस्थापनाला बळकटी मिळेल आणि टिकाऊ अन्नधान्य क्षेत्राची निर्मिती होण्यास मदत होईल.
शोबा सुरी ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये वरिष्ठ फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.