Author : Siddharth Yadav

Expert Speak Digital Frontiers
Published on Oct 07, 2024 Updated 0 Hours ago

न्यूरोमस्क्युलर विकारांवर उपचार करण्याची मोठी क्षमता बीसीआयमध्ये आहे; परंतु विशेषतः विविध सरकारे आणि कंपन्या व्यापारी व संरक्षण क्षेत्रात बीसीआयचा वापर करण्याचा विचार करीत असल्याने नैतिक आणि सुरक्षाविषयक चिंता वाढल्या आहेत.

ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेसची उदयोन्मुख सुरक्षा आणि नैतिक स्थिती

Image Source: Getty

    शरीरातील चेतासंस्थेचे मार्ग बायपास करून मेंदू आणि बाह्य उपकरणांदरम्यान संपर्काचा मार्ग मोकळा करण्याचे कार्य ब्रेन-कम्प्युटर इंटरफेसेस (बीसीआयएस) या उपकरणांकडून आणि प्रणालींकडून करण्यात येते. सामान्यतः बीसीआय कम्प्युटरसारख्या बाह्य साधनांना केंद्रीय मज्जासंस्थेकडून येणारे सिग्नल प्राप्त करणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि या सिग्नलचे आदेशांमध्ये रूपांतर करणे शक्य करतात. बीसीआयच्या विकासासाठी सुरुवातीला म्हणजे १९६९ आणि १९७० मध्ये माकडांवर चाचण्या करण्यात आल्या. त्या पाठोपाठ १९९० च्या दशकात मानवावर चाचण्या करण्यात आल्या. कम्प्युटरच्या स्क्रीनवरील कर्सर मेंदूच्या लहरींचा वापर करून नियंत्रित केला जाऊ शकतो, हे संशोधकांनी १९९१ मध्ये प्रथम दाखवून दिले. प्रारंभीच्या संशोधनात न्युरोमस्क्युलर विकार, मेंदूचा पक्षाघात किंवा पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे गंभीर अपंगत्व आलेल्या रुग्णांना मदत करण्यासाठी बीसीआयचा वापर करण्यावर भर देण्यात आला. उदाहरणार्थ, एएलएस असलेल्या एका व्यक्तीवर बीसीआयचा जोरकस वापर करून पहिली क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. त्यानंतरच्या दशकांमध्ये मशीन लर्निंग, सिग्नल प्रोसेसिंग आणि न्युरो इमेंजिंगसारख्या तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे बीसीआयच्या कार्यक्षमतेत वाढ झाली आहे.

    ईईजी आधारित बीसीआयमध्ये व्यावसायिक विकासक्षमता आहे. कारण बीसीआय उपकरणे ही अधिक पोर्टेबल आहेत. शिवाय या प्रक्रियेत सेन्सर्स अशा पद्धतीने टाळूवर ठेवले जातात, की हेडसेट वापरून ती कार्यान्वित केली जाऊ शकतात.

    बीसीआयची व्यावसायिक लोकप्रियता नॉन-इनव्हेझिव्ह बीसीआयमधील कल्पकतेमुळे वाढली आहे. ती त्यासारख्या अन्य इनव्हेझिव्ह साधनांच्या तुलनेत अधिक किफायतशीर आणि मोजता येण्यासारखी आहे. नॉन-इनव्हेझिव्ह बीसीआय मेंदूच्या हालचालींचे निरीक्षण, या हालचाली जाणून घेणे आणि त्यांचे रूपांतर करणे या कार्यासाठी इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (ईईजी) चा वापर करतात. ईईजी आधारित बीसीआयमध्ये व्यावसायिक विकासक्षमता आहे. कारण बीसीआय उपकरणे ही अधिक पोर्टेबल आहेत. शिवाय या प्रक्रियेत सेन्सर्स अशा पद्धतीने टाळूवर ठेवले जातात, की हेडसेट वापरून ते कार्यान्वित केले जाऊ शकतात. मात्र, इनव्हेझिव्ह बीसीआय अधिक खर्चिक असतात आणि त्यासाठी शस्त्रक्रियेचीही आवश्यकता भासू शकत असली, तरी त्यांना मिळालेल्या उच्च क्षमतेच्या सिग्नलमुळे ते अधिक विश्वासार्ह डेटा देत असतात. न्यूरालिंक या बीसीआय कंपनीने सर्वांगाला पक्षाघात झालेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी इनव्हेझिव्ह बीसीआय पद्धतीचा यशस्वीरीत्या वापर केला आहे. कंपनीला मिळालेल्या यशामुळे बीसीआयचे मार्केटिंग तर झालेच, शिवाय मानव-मशिन परस्परसंवादाच्या नव्या युगाची चाहूलही लागली असल्याचे संकेत मिळाले आहेत. बीसीआय सेन्सरी मोटर विकार आणि दुर्बल न्यूरोमस्क्युलर विकारांवर उपचार करतेच शिवाय मेंदू ते मेंदू असा थेट संपर्क साधू शकते, हेही यातून समोर आले.

    बीसीआयबाबत सरकार उत्सुक

    दुहेरी वापर करण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून बीसीआयचे वर्गीकरण केले जात असल्याने त्यामुळे येणारी संभाव्य जोखीम लक्षात घेऊन जास्तीत जास्त क्षमताही विचारात घ्यायला हवी. बीसीआयची जोखीम ही व्यक्तीव्यक्तीमधील संज्ञानात्मक (कॉग्निटिव्ह) वाढ सुलभ करणे आणि नव्या देखरेख क्षमता विकसित करणे या क्षमतांशी निगडीत आहे. सरकारने न्यूरो-तंत्रज्ञान व्यासपीठाच्या लष्करी वापरासाठीच्या संशोधनासाठी याआधीच निधी पुरवण्यास सुरुवात केली आहे, यात आश्चर्य नाही. चीन आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेले न्यूरोसायन्स केंद्रित सरकारी प्रकल्प ही याची दोन उल्लेखनीय उदाहरणे आहेत. दि चायना ब्रेन सायन्स अँड ब्रेन इनस्पायर्ड प्रोजेक्टकिंवा चायना ब्रेन प्रोजेक्ट(सीबीपी) या नावाने ओळखला जाणारा प्रकल्प देशातील वैज्ञानिक व तांत्रिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी एका व्यापक धोरणाचा भाग म्हणून २०१६ मध्ये सुरू करण्यात आला. हे ॲडव्हान्सिंग इनोव्हेटिव्ह न्यूरोटेक्नॉलॉजीज (बीआरएआयएन) इनिशिएटिव्हच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अमेरिकेच्या मेंदू संशोधन २०१३ शी समानता दर्शवते. विशेषतः मेंदूविषयक कार्ये व पद्धतींची समज अधिक वाढवण्यासंबंधात समानता दिसते. दोन्ही गोष्टींमध्ये मेंदूविषयक आणि मानसिक विकारांचे निदान, उपचार आणि प्रतिबंध यांवर भर दिला जातो. मात्र, कॉग्निटिव्ह रोबोटिक्सआणि ब्रेन इन्स्पायर्ड चिप्ससारखी मेंदूप्रेरित कृत्रिम प्रज्ञा व्यासपीठे विकसित करण्यावर भर दिल्याने सीबीपी बीआरएआयएनपासून वेगळा ठरतो. अशी व्यासपीठे विकसित करण्यासाठी सीबीपी न्युरोसायन्स, कृत्रिम प्रज्ञा आणि प्रगत मशिन लर्निंग यांसारख्या क्षेत्रांमधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते. अमेरिकेतील पद्धतीपेक्षा हे भिन्न आहे. मेंदूचे कार्य व मेंदूसंबधातील विकार समजून घेण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला जातो. कृत्रिम प्रज्ञेचे स्थान दुय्यम असते. तरीही बीआरएआयएन उपक्रमाला डिफेन्स ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी (डीएआरपीए) सारख्या अमेरिकेच्या संरक्षण संस्थांकडून भरीव आर्थिक साह्य मिळते, हे लक्षात घेता, अमेरिकेला नव्या मेंदूतंत्रज्ञान व्यासपीठांचा अवलंब करण्याची इच्छा असण्याची शक्यता आहे.

    दि चायना ब्रेन सायन्स अँड ब्रेन इनस्पायर्ड प्रोजेक्टकिंवा चायना ब्रेन प्रोजेक्ट(सीबीपी) या नावाने ओळखला जाणारा प्रकल्प देशातील वैज्ञानिक व तांत्रिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी एका व्यापक धोरणाचा भाग म्हणून २०१६ मध्ये सुरू करण्यात आला.

    सीबीपीला चीन सरकारकडूनही भरीव आर्थिक साह्य मिळते, यात नवल नाही. शिवाय चीन सरकारकडून चीनमधील संशोधन संस्था, विद्यापीठे आणि खासगी क्षेत्र यांदरम्यान सहकार्याला चालना देते. प्रकल्पाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय सहकार्यास प्रोत्साहन देत असले, तरी ते एकाच वेळी देशांतर्गत संशोधन आणि राष्ट्रीय स्वावलंबनाला चालना देण्याच्या दीर्घकालीन उद्दिष्टावर भर देते. सीबीपी पद्धतीच्या दृष्टीने अमेरिकेच्या बीआरएआयएन उपक्रमाप्रमाणेच व्यापक ब्रेन मॅपिंग पद्धतींमध्ये सहभाग घेते. मात्र, हे या प्रयत्नांना कृत्रिम प्रज्ञा संशोधन आणि मोठे डेटासेट हाताळण्यासाठी न्यूरोइन्फर्मेटिक्स साधनांच्या विकासासाठी एकत्र आणते. चीनमधील नैतिक आणि नियामक वातावरणाचा अन्य देशांच्या तुलनेत बीसीआय आणि न्यूरोतंत्रज्ञान विकासाच्या अंमलबजावणीवर आणि दिशानिर्देशांवर वेगळ्या प्रकारे प्रभाव पडू शकेल. ज्या देशांमध्ये संशोधन मार्गदर्शक तत्त्वे अधिक प्रतिबंधात्मक आहेत, त्या देशांमधील शास्त्रज्ञांना चीनमधील अनुकूल वातावरण आकर्षित करू शकेल, असे मत सीबीपीचे संचालक मु-मिंग पू यांनी व्यक्त केले आहे. अलीकडील काही वर्षांत जनरेटिव्ह एआयसारख्या कृत्रिम प्रज्ञेच्या अवलंबात अचानक वाढ झाल्याने नव्या तंत्रज्ञानामधील गुंतवणुकीचे महत्त्व जगभरातील सरकारांच्या स्पष्टपणे लक्षात आले आहे; तसेच नवे कायदे व नियमांची माहिती करून घेण्यास प्रवृत्त केले आहे. भू-राजकीय आणि आर्थिक महत्त्व लक्षात घेता तंत्रज्ञान आश्चर्यटाळण्यासाठी आणि कल्पकतेतील प्रथम प्रवर्तकहोण्यासाठी भविष्यात न्यूरोतंत्रज्ञानाच्या अवलंबाचा समावेश असलेली जागतिक स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बीसीआयमधील सरकारी गुंतवणूकही वाढू शकते. कारण त्यांची सुरक्षा संबंधित आणि लष्करी क्षमता अधिक ठळक होईल. नाटोने आधीच निर्णयक्षमता सुधारणे, परिस्थितीजन्य जागरूकता वाढवणे, जलद संपर्क आणि मानवरहीत प्रणालींवर नियंत्रण आणणेआणि बीसीआयचा वापर करून लोकसंख्येच्या स्तरावर आकलनशक्ती वाढवण्याच्या संभाव्यतेवर चर्चा सुरू केली आहे. बीसीआयच्या वैद्यकीय, व्यावसायिक आणि लष्करी क्षमतेमुळे जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया या देशांना आणि युरोपीय महासंघासारख्या संघटनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय न्यूरोतंत्रज्ञान प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यास उद्युक्त केले आहे.

    बीसीआयचे व्यापारीकरण होण्याचा धोका

    लष्करी अवलंबाच्या पलीकडे बीसीआयचे व्यापारीकरण अनेक नैतिक आणि कायदेशीर चिंता निर्माण करते. त्या संदर्भात धोरणकर्ते, संशोधक आणि विकासकांनी काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. नव्या बीसीआय व्यासपीठाशी संबंधित जोखमीचा विचार करताना आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने (ओईसीडी) २०१९ मध्ये न्युरोतंत्रज्ञानातील जबाबदार कल्पकतेची शिफारस केली आहे. या अहवालात अधोरेखित केलेला चिंतेचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, गोपनीयता आणि डेटा सुरक्षा: बीसीआय संवेदनशील न्यूरल व वर्तणूकविषयक डेटा संकलित करू शकतात आणि संभाव्यपणे प्रसारित करू शकतात; तसेच त्याला पुरेसे संरक्षण न मिळाल्यास त्याचा अवैध वापर होण्याची शक्यताही असते. अहवालात संज्ञानात्मक स्वातंत्र्यआणि व्यक्तीच्या मानसिक आत्मनिर्णयाच्या अधिकारावर गदा यांसारख्या नव्या धोक्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अशी परिस्थिती सामान्यतः विज्ञानकथांमध्ये असते. बीसीआय विकासकांकडून न्यूरल व वर्तणूकविषयक डेटा मिळवण्याची शक्यता असल्याने न्यूरल डेटाची मालकी, कायदेशीर स्थिती व गोपनीयता यांबद्दलचे प्रश्न; तसेच या डेटाचे संरक्षण कसे केले जावे, यांसारखे गंभीर प्रश्न उपस्थित होतात. युनेस्को इंटरनॅशनल बायोएथिक्स कमिटी (आयबीसी)नेही २०२१ मध्ये न्यूरोतंत्रज्ञान व्यासपीठाच्या नैतिक परिणामांवर एक अहवाल प्रसिद्ध केला होता. बीसीआय व्यासपीठामधील अप्रकट नैतिक आणि कायदेशीर समस्यांचे निराकरण करण्यासाठी सध्याचा मानवी हक्क आराखडा पुरेसा आहे का की न्यूरोहक्कांच्या नव्या आराखड्याची आवश्यकता आहे, असा प्रश्न या अहवालात विचारण्यात आला आहे. वैद्यकीय धोक्याच्या संदर्भात हे लक्षात घ्यायला हवे, की संज्ञानात्मक कार्य, वर्तन आणि मानसिक आरोग्यावर इनव्हेझिव्ह बीसीआयचा दीर्घकालीन प्रभाव अद्याप नीट लक्षात आलेला नाही. अशा प्रकारच्या असुरक्षिततेसाठी बीसीआयच्या संभाव्य प्रभावाचा संपूर्ण पट समजून घेण्यासाठी दीर्घकालीन अभ्यास आणि निरीक्षणांची आवश्यकता असते.

    अहवालात अधोरेखित करण्यात आलेली एक महत्त्वाची चिंता म्हणजे गोपनीयता व डेटा सुरक्षेचा मुद्दा : बीसीआय संवेदनशील न्यूरल आणि वर्तणुकीशी संबंधित डेटा संकलित व प्रसिद्ध करू शकतात. पुरेसे संरक्षण नसेल, तर त्याचा अवैधपणे वापर होण्याची असुरक्षितताही असते.

    पुढील मार्गक्रमण

    सुसंगत डेटा गोपनीयता नियम: न्यूरोतंत्रज्ञानामधील जबाबदार नवकल्पनेवरील ओईसीडी शिफारस एक सुरुवात म्हणून घेऊन सरकारने विशेषतः बीसीआयसाठी डेटा गोपनीयता व सुरक्षा नियम तयार करायला हवेत. या नियमांनी न्यूरल व वर्तणूक डेटासाठी भक्कम एन्क्रिप्शन मानके सक्तीची करायला हवीत; तसेच अशा डेटावर स्पष्ट मालकी हक्क सांगायला हवेत आणि डेटा संकलन व वापरासाठी सूचित अनुमती आवश्यक आहे. त्याचप्रमाणे गोपनीयतेच्या मानकांचे पालन निश्चित करण्यासाठी धोरणे आखून बीसीआय प्रणालींचे नियमित ऑडिट आणि मूल्यांकन करणे भाग पाडायला हवे. यामुळे न्यूरल माहितीची अवैध उपलब्धता व संभाव्य गैरवापर करण्यापासून व्यक्तींना संरक्षण मिळू शकेल.

    शस्त्रक्रियेचा समावेश असलेल्या बीसीआयचा वापर करणारे दवाखाने आणि डॉक्टर यांना कठोर पालन मानके प्रसिद्ध करणे गरजेचे आहे.

    दीर्घकालीन आरोग्य व सुरक्षितता संशोधनाला चालना: युनेस्को आयबीसी २०२१ च्या अहवालात अधोरेखित केल्याप्रमाणे बीसीआयच्या सातत्यपूर्ण वापराचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरील परिणाम लक्षात घेण्यासाठी दीर्घकालीन संशोधनासाठी निधी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इनव्हेझिव्ह बीसीआय व्यासपीठे आणि त्यांच्या अवलंबासाठी चाचणी व नियामक मानके अधिक कठोर असणे आवश्यक आहे. शस्त्रक्रियेचा समावेश असलेल्या बीसीआयचा वापर करणारे दवाखाने आणि डॉक्टर यांना कठोर पालन मानके प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. विविध सरकारांनी एक नियामक आराखडाही निर्माण करायला हवा. त्यासाठी अवलंबाच्या आधी सुरक्षा चाचणी आणि अवलंबानंतर मूल्यांकन करणे गरजेचे आहे. शिवाय विशेषतः इनव्हेझिव्ह बीसीआयच्या न्यूरोतंत्रज्ञान अवलंबावरील अभिप्रायही आवश्यक आहे. त्यामुळे संभाव्य धोका कमी करण्यास मदत होईल.

    नैतिक मानके आणि न्यूरोअधिकारांच्या संरक्षणासाठी: बीसीआयचे संभाव्य धोके कमी करण्यासाठी सरकारांनी युनेस्को आणि न्यूरॉलॉजिस्ट फाउंडेशनसारख्या स्वित्झर्लंडमधील ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांसमवेत काम करायला हवे; तसेच वैयक्तिक डेटाच्या संरक्षणासाठी वैश्विक नैतिक मानके विकसित करायला हवीत आणि कायद्याने संरक्षण द्यायला हवे. या मानकांमध्ये मानसिक गोपनीयतेचा अधिकार, संज्ञानात्मक स्वातंत्र्य आणि मानसिक एकात्मतेचा समावेश असावा आणि व्यक्तींचे आपल्या मानसिक आरोग्यावर नियंत्रण असेल अशी आणि अवैधरीत्या गैरवापर होणार नाही, याचीही खात्री त्यांना देण्यात यावी. त्याचप्रमाणे गुन्हेगारीसंबंधीची न्यायव्यवस्था आणि आरोग्य सेवेसह विविध क्षेत्रांमध्ये बीसीआयच्या नैतिक अवलंबावर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षण संस्था स्थापन केल्याने या अधिकारांचे समर्थन करण्यात आणि निष्काळजीपणा व गैरवापर रोखण्यास मदत होईल


    सिद्धार्थ यादव हे पीएचडी स्कॉलर असून इतिहास, साहित्य आणि संस्कृती हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.