Expert Speak Urban Futures
Published on Jul 09, 2024 Updated 0 Hours ago

शहरी बहुपक्षीयता, जुळ्या शहरांची भागीदारी आणि उत्तम सहकार्य यासारख्या उपक्रमांद्वारे, हवामान कृती, आर्थिक समानता आणि शाश्वत वाढीसाठी उपाय शोधू शकते.

Network च्या माध्यमातून जोडली जाणारी शहरे: शाश्वत विकासासाठी शहरी बहुपक्षीयता

शहरे ही शोध, आर्थिक उत्साह आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे प्रमुख केंद्रे बनली आहेत. आजची शहरे समान आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारीचा लाभ घेत आहेत. आज, शहरे आणि आंतरराष्ट्रीय संघटना एकमेकांना सहकार्य करून आणि 'शहरी बहुपक्षीय' माध्यमातून शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी त्यांच्या सामूहिक शक्तीचा वापर करून त्यांच्या सामायिक अनुभवांचा आणि स्वारस्यांचा लाभ घेत आहेत. 

शहरी बहुपक्षीयतेची कल्पना शहरांचे अद्वितीय ज्ञान, संसाधने आणि क्षमता ओळखते तसेच हवामान बदल आणि आर्थिक विषमतेचा सामना करण्यासाठी शहरांमधील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करते.

शहरी बहुपक्षीयतेची कल्पना शहरांचे अद्वितीय ज्ञान, संसाधने आणि क्षमता ओळखते तसेच हवामान बदल आणि आर्थिक विषमतेचा सामना करण्यासाठी शहरांमधील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करते. हे आंतरशहरी संबंध संसाधने आणि कौशल्य सामायिक करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सहयोगी मंच प्रदान करतात. जागतिक समस्यांना तोंड देण्यासाठी शहरी बहुपक्षीयता कशी विकसित केली जाऊ शकते? आंतरराष्ट्रीय संस्था, विशेषतः ग्लोबल साउथमधील शहरांमधील भागीदारीला प्रोत्साहन आणि समर्थन कसे देऊ शकतात? हे संबंध सर्वोत्तम उपाय सामायिक करण्याच्या आणि शाश्वत विकास साध्य करण्याच्या प्रयत्नांमध्ये सुसंवाद कसा आणू शकतात?

शहरी बहुपक्षीयता

शहरी बहुपक्षीयता जागतिकीकरण आणि जागतिक स्थानिकीकरणाच्या आयामांचे प्रतिनिधित्व करते. या अंतर्गत, शहरांमधील भागीदारीला प्रोत्साहन दिले जाते जेणेकरून ते नेतृत्वाची भूमिका घेऊ शकतील. जागतिकीकरण व्यापार आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगाच्या परस्परावलंबनावर भर देते. त्याच वेळी, जागतिकीकरण हे समाजाच्या समस्यांच्या परस्पर संबंधांना मान्यता देताना स्थानिक आणि जागतिक समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करते.

इंटरनॅशनल युनियन ऑफ लोकल ऑथॉरिटीजची स्थापना 1913 मध्ये झाली, ज्यानंतर युरोप, लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशियामध्ये शहरांची भरभराट झाली. 2004 मध्ये युनायटेड सिटीज अँड लोकल गव्हर्नमेंट्स (UCLG) च्या स्थापनेने स्थानिक प्रशासनाच्या महत्त्वावर भर दिला. आज, हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रांची परिषद, प्रभावी विकास सहकार्यासाठी जागतिक भागीदारीची सुकाणू समिती, संयुक्त राष्ट्र 2030 अजेंडा आणि संयुक्त राष्ट्र-हॅबिटॅटचा न्यू अर्बन अजेंडा यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन एक सार्वजनिक जागतिक अजेंडा तयार करण्यात हे नेटवर्क मध्यवर्ती भूमिका बजावतात.

अशा संघटनांमुळे, आर्थिक विकास, सामाजिक संरक्षण आणि पर्यावरणीय शाश्वततेतील संधी ओळखण्यासाठी आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी शहरांमध्ये सहकार्य वाढते. याव्यतिरिक्त, ही परिसंस्था स्थानिक अधिकाऱ्यांना सार्वजनिक मूल्य निर्माण करण्यास देखील मदत करते. आजच्या शहरी वातावरणात हे काम अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. उदाहरणार्थ, युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (UCCN) शाश्वतता वाढवण्यासाठी सर्जनशीलतेचे पोषण करते. वैयक्तिक आणि सामूहिक भागीदारीद्वारे शहरांना बाजारपेठेतील अपयशांना सामोरे जाण्यासाठी एक फायदा देते आणि त्यांची वाढीची धोरणे तयार करण्यासाठी केवळ अंतर्गत तज्ञांवर अवलंबून नाही.

ग्लोबल साउथ आणि ग्लोबल नॉर्थमधील शहरांमधील जाळे

ध्रुवीकरण आणि राष्ट्रवादाला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी शहरे विविध शहरी केंद्रांमध्ये संवाद वाढवू शकतात, विश्वास निर्माण करू शकतात, परस्पर आदर वाढवू शकतात आणि उत्तर आणि दक्षिण यांच्यात भागीदारी वाढवू शकतात. G-20 नेत्यांच्या जाहीरनाम्यात जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि प्रशासन सुधारण्यासाठी बहुपक्षीयतेचे पुनरुज्जीवन करण्याचे आवाहन करण्यात आले. जाहीरनाम्यात स्थानिक पातळीवर जनतेला सेवा देण्यासाठी G-20/ADB च्या आराखड्याला मान्यता देण्यात आली आणि विशिष्ट गरजांसाठी बांधण्यात आलेल्या भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उदाहरणार्थ, सिटीज क्लायमेट लीडरशिप ग्रुप (C-40) आणि UCLG च्या प्रयत्नांद्वारे, ब्युनोस आयर्स आणि पॅरिस यांनी शहरांचा अजेंडा G-20 शी जोडत अर्बन-20 उपक्रम सुरू केला. 

ध्रुवीकरण आणि राष्ट्रवादाला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी शहरे विविध शहरी केंद्रांमध्ये संवाद वाढवू शकतात, विश्वास निर्माण करू शकतात, परस्पर आदर वाढवू शकतात आणि उत्तर आणि दक्षिण यांच्यात भागीदारी वाढवू शकतात. 

शाश्वततेसाठी स्थानिक सरकारे (ICLEI) हवामान आणि उर्जेसाठी महापौरांचा जागतिक करार आणि संयुक्त राष्ट्रांचा शाश्वत विकास उद्दिष्टे शहरांचा मंच परवडणारी घरे, स्वच्छ ऊर्जा, शाश्वत वाहतूक आणि सर्वसमावेशक आर्थिक वाढीस प्रोत्साहन देतात. ग्लोबल साउथमधील शहरांमधील 34 प्रकल्पांच्या विकासासाठी C-40 ग्रुप एक अब्ज डॉलर्सचा निधी देखील देत आहे. इंटरनॅशनल सिटी नेटवर्क्सच्या निर्देशिकेत आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक शहरी प्रकल्पांची माहिती प्रकाशित करून ग्लोबल सिटीज हब मुख्य शहरांना जोडत आहे.

द कोअॅलिशन ऑफ सिटीज (COC) आणि युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर प्रोजेक्ट सर्व्हिसेस (UNOPS) ग्रेटर हॉर्न ऑफ आफ्रिका आणि बे ऑफ बंगाल प्रदेशातील अनेक देणगीदारांनी दिलेला निधी चालवतात. ICLEI दक्षिण आशियाने भारताच्या भावनगर महानगरपालिकेशी त्याच्या हवामान कृती योजनेवर भागीदारी केली आहे, जी हवामान आणि उर्जेसाठी महापौरांच्या जागतिक कराराच्या सामान्य अहवाल आराखड्याशी संलग्न आहे. अशा सहयोगी धोरणांमुळे शहरांना परस्परांशी जोडलेल्या जगाच्या समस्यांचा सामना करण्यास मदत होते.

जागतिक एकजुटीच्या दिशेने

जोपर्यंत शहर भागीदारीचा प्रश्न आहे, ते सहयोगी जाळे विकसित आणि प्रोत्साहन देऊ इच्छितात. तथापि, त्यांना आर्थिक आणि भू-राजकीय अनिश्चितता, आर्थिक अस्थिरता, सामाजिक-आर्थिक मतभेद आणि देशांतर्गत चिंता यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे सामना करण्याची प्रक्रिया मंदावते. शिवाय, कोविड-19 महामारीने प्रथम आघाडी म्हणून शहरांची भूमिका प्रस्थापित केली आहे. अशा परिस्थितीत, विश्वास वाढवण्यासाठी आणि मजबूत, शाश्वत आणि संतुलित विकास साध्य करण्यासाठी मुत्सद्देगिरीची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करत, उपाय हे परिवर्तनशील क्षमतेसाठी देखील जबाबदार असले पाहिजेत.

सक्रिय शहरी भागीदारी

शहरी संघटनांना सक्षम करण्यासाठी आणि अर्बन-२०,जुळी शहरे आणि ग्लोबल टास्क फोर्स फॉर लोकल अँड रिजनल गव्हर्नमेंट सारख्या नेटवर्कचा लाभ घेण्यासाठी ऊर्जावान शहरी सहकार्य पारंपरिक नोकरशाही अडथळ्यांवर मात करते. यामुळे संपर्क वाढवण्याच्या मौल्यवान संधी उपलब्ध होतात. सुरक्षा आणि दहशतवादाचा सामना करण्याच्या बाबतीतही फायदे आहेत. उदाहरणार्थ, स्ट्रॉंग सिटीज नेटवर्क हिंसक अतिरेकी कारवायांचा सामना करण्यावर लक्ष केंद्रित करते. युनेस्कोचे ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) साध्य करण्यासाठी आजीवन शिक्षणाला प्रोत्साहन देते. 24 देशांतील 77 शहरांमध्ये सक्रिय असलेले सुरक्षित शहरांवरील संयुक्त राष्ट्रांचे हॅबिटॅट्स ग्लोबल नेटवर्क, जागतिक सहकार्याद्वारे शहरी सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना मदत करते.

जनतेला प्राधान्य

जमिनीवरील वास्तव आणि असमानता दूर करण्यासाठी सर्व भागधारकांना गुंतवून ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे, आंतरराष्ट्रीय समस्यांना जनमतांशी जोडणे आणि खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील सहकार्याला प्रोत्साहन देणे यामुळे विश्वास निर्माण होऊ शकतो आणि जागतिक प्रशासन सुधारू शकते. उदाहरणार्थ, जागतिक आरोग्य संघटनेचे 'ग्लोबल नेटवर्क फॉर एज-फ्रेंडली सिटीज अँड कम्युनिटीज' सामान्य आव्हानांसाठी माहिती आणि उपाय सामायिक करण्यात मदत करते. हे सर्वसमावेशक शहरी वातावरणाला प्रोत्साहन देते आणि शहरी आरोग्य आणि प्रशासनातील बहुपक्षीय सहकार्याचे फायदे अधोरेखित करते.

जमिनीवरील वास्तव आणि असमानता दूर करण्यासाठी सर्व भागधारकांना गुंतवून ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे, आंतरराष्ट्रीय समस्या जनमताला जोडून आणि खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील सहकार्याला प्रोत्साहन देऊन विश्वास वाढवता येऊ शकतो.

आर्थिक सहकार्य

सहयोगी आर्थिक प्रयत्नांद्वारे जागतिक शहरे डी-ग्लोबलायझेशन साठी त्यांची लवचिकता वाढवू शकतात. दुबईतील हाँगकाँगचे आर्थिक आणि व्यापार कार्यालय व्यवसायाच्या संधींचे पोषण करते आणि आखाती सहकार्य परिषदेशी संबंध मजबूत करते. त्याचप्रमाणे, दुबई, रियाध आणि शेंगेनमधील विशेष आर्थिक क्षेत्रे उद्योजकतेला प्रोत्साहन देतात आणि परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करतात. सेऊल, शांघाय, सिंगापूर, क्वालालंपूर आणि मुंबई यासारखी शहरे त्यांच्या पायाभूत सुविधा, प्रतिभा आणि सहयोगी धोरणांमुळे संशोधन, विकास आणि व्यवसाय नवकल्पनांची केंद्रे बनली आहेत. शिगुहुआ विद्यापीठ, सिंगापूरचे राष्ट्रीय विद्यापीठ आणि IIT मुंबई यासारखी मोठी विद्यापीठे आशियाई महानगरांमध्ये त्यांना आकर्षित करून अपवादात्मक प्रतिभेचे पोषण करतात. जोखीम पत्करणारे भांडवलदार, स्टार्ट-अप्स आणि त्यांच्या प्रवर्तकांसाठी शहरांकडून मिळणारा पाठिंबा नवकल्पना आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन देतो आणि या शहरांना जागतिक विकासात आघाडीवर ठेवतो.

आर्थिक संपर्क

ग्लोबल नेटवर्क ऑफ सिटीज सदस्यांना आंतरराष्ट्रीय भागीदार आणि शहरी कार्यक्रमांशी संपर्क साधण्याची संधी प्रदान करते. या कार्यक्रमांना अनेकदा युरोपियन युनियन आणि जागतिक बँकेसारख्या बहुपक्षीय संस्थांकडून निधी मिळतो. यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या, देणगीदार, विद्यापीठे, संशोधन केंद्रे आणि जागतिक माध्यमांचा समावेश आहे. तथापि, काही वेळा, राजनैतिक प्राधान्यांमुळे हे सदस्यत्व सक्रिय होण्याऐवजी अप्रत्यक्ष सहभागी बनते. अशा परिस्थितीत, शहरे त्यांच्या विशिष्ट समस्यांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी नोकरशाहीची बंधने तोडून इतर शहरांतील लोकांशी थेट संपर्क साधू शकतात. उदाहरणार्थ, सामुदायिक गट तयार करून, बार्सिलोना, पॅरिस आणि न्यूयॉर्कसारखी शहरे सिटीज फॉर एडेक्वेट हाऊसिंग मोहिमेवर सहकार्य करीत आहेत, त्वरित कारवाई करून स्थानिक प्रशासनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ठोस परिणाम आणत आहेत.

स्थानिक पातळीवर प्रयत्न करणे

शहरांमधील सहकार्य हे शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थानिक प्रयत्नांना मदत करते. उदाहरणार्थ, बांगलादेशचा स्वयंसेवी गट जिल्हा आणि उपजिल्हा स्तरावरील SDG शी जोडतो. हे तळागाळातील लोकांना जोडते. त्याचप्रमाणे, दक्षिण आफ्रिकेची ई-थेक्विनी धोरणात्मक अभिसरण आणण्यासाठी शहराच्या एकात्मिक विकास योजनेला SDG  शी जोडते. हा ट्रेंड जगभरात दिसून येत आहे. ब्राझील, कोलंबिया आणि भारतातील शहरे स्थानिक विकास उद्दिष्टे स्थानिक धोरणे आणि योजनांच्या चौकटीचा भाग बनवत आहेत आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी संदर्भ निर्देशांकांचा वापर करत आहेत. उदाहरणार्थ, SDG ची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करता यावी यासाठी ओपनसिटी इन्स्टिट्यूटने पटियाला शहराशी करार केला आहे. ग्लोबल ऑब्जर्वेटरी ऑफ अर्बन आर्टिफिशियल इंटेलिजेंस सारख्या उपक्रमांवरून डिजिटल अधिकार आणि नैतिक AI (Artificial Intelligence) मानके आणि स्थानिक कृती यावर आंतरराष्ट्रीय सहकार्य जागतिक आव्हानांचा सामना कसा करत आहे हे दिसून येते. किमान 300 शहरांमध्ये युती असलेले असे जाळे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी राजनैतिक सहमतीला प्रोत्साहन देते. स्थलांतरितांना संरक्षण दिले जाते आणि स्थानिक उपक्रमांचा सार्वजनिक आरोग्यासारख्या समस्यांवर जागतिक परिणाम होतो. 

ग्लोबल ऑब्जर्वेटरी ऑफ अर्बन आर्टिफिशियल इंटेलिजेंस सारख्या उपक्रमांवरून डिजिटल अधिकार आणि नैतिक AI (Artificial Intelligence) मानके आणि स्थानिक कृती यावर आंतरराष्ट्रीय सहकार्य जागतिक आव्हानांचा सामना कसा करत आहे हे दिसून येते.

डेटा आणि तंत्रज्ञानाद्वारे चालविलेले दृष्टीकोन

पुरावा-आधारित दृष्टिकोनांचा अवलंब करून शहरी धोरणांना आकार देण्यात शहरी जाळे मध्यवर्ती भूमिका बजावत आहेत. आर्थिक, सामाजिक आणि वाहतूक जाळे शहरी प्रक्रियांवर कसा परिणाम करतात, शहरांच्या शर्यतीपासून लवचिकता यासारख्या उपक्रमांचे संघटित सामूहिक प्रयत्नांमध्ये कसे रूपांतर करतात हे शहरे आणि जाळ्यांच्या हस्तपुस्तिकेत स्पष्ट केले आहे. कार्यक्रम ठरवण्यासाठी आणि नोकरशाहीचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी महापौरांना सक्षम करून, शहरी नेतृत्वाला चालना देण्यासाठी आणि मूर्त परिणाम साध्य करण्यासाठी नवीन भागीदारांना सामील करणे आवश्यक आहे. प्रभावी परिणाम साध्य करण्यासाठी, विशिष्ट स्थानिक संदर्भांशी संबंधित असलेल्या माहितीची विश्वासार्ह अनुक्रमणिका स्थापित करणे आवश्यक आहे. यासाठी नेटवर्कच्या सचिवालयांकडून दृढ वचनबद्धतेची आवश्यकता असेल. उदाहरणार्थ, बार्सिलोना, अॅमस्टरडॅम आणि न्यूयॉर्कसह इतर 50 शहरांनी सिटीज कोअॅलिशन फॉर डिजिटल राइट्स सुरू केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) नैतिक वापरासाठी डिजिटल असमानता दूर करणे हा यामागचा उद्देश आहे

सांस्कृतिक देवाणघेवाण आणि शहरांमधील आर्थिक सहकार्य हे नवीन शहरी कार्यक्रमाला चालना देतात आणि जागतिक एकता बळकट करतात.

निष्कर्ष

वाढत्या शहरांच्या गरजा आणि समुदायांच्या आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर लवचिकता निर्माण करण्यासाठी संसाधने आणि तांत्रिक कौशल्य एकत्रित केले पाहिजे. जुळी शहर भागीदारी आणि लवचिकता जाळे यासारखे शहरी बहुपक्षीय धोरण लवचिक समुदायांना प्रोत्साहन देते आणि शाश्वतता वाढवते. सांस्कृतिक देवाणघेवाण आणि शहरांमधील आर्थिक सहकार्य हे नवीन शहरी कार्यक्रमाला चालना देतात आणि जागतिक एकता बळकट करतात. त्यामुळे उज्ज्वल आणि परस्परांशी जोडलेल्या भविष्यासाठी शहरी बहुपक्षीयता आवश्यक ठरते. शेवटी, शहरांच्या जागतिक नेटवर्कचे यश हे शहरांच्या तात्काळ समस्यांना सामोरे जाण्याच्या त्यांच्या क्षमतेवर आणि त्यांच्या प्रयत्नांचे ठोस परिणाम शहरांतील रहिवाशांना दाखवण्यावर अवलंबून असेल.


अनुषा केसरकर गवाणकर या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या वरिष्ठ फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.