Expert Speak Raisina Debates
Published on Jul 22, 2024 Updated 0 Hours ago

सध्याच्या काळात युद्धाचे स्वरूप बदलत असून त्याला भौतिक संघर्षातून पुढे जात अदृश्य तांत्रिक हल्लाचे स्वरूप येत आहे. म्हणूनच, एआयच्या युगात सुरक्षा, सामर्थ्य आणि मिलिटरी इंडस्ट्रीअल कॉम्प्लेक्सबाबतच्या आपल्या समजातही बदल होण्याची गरज आहे.

AI च्या युगामधील मिलिटरी इंडस्ट्रीअल कॉम्प्लेक्स

Image Source: युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी

१९६० मध्ये आयसेनहोवर यांनी २० व्या शतकातील अमेरिकेचे आक्रमक परराष्ट्र धोरण आणि अस्थिर भुराजनीतीच्या संदर्भात उदयास आलेल्या संरक्षण तंत्रज्ञान उत्पादक आणि सरकारमधील सहसंबंधांचे वर्णन करण्यासाठी पहिल्यांदा मिलिटरी इंडस्ट्रिअल कॉम्प्लेक्स या संज्ञेचा वापर केला. ही व्यवस्था अन्याय्य बाजाराच्या परिस्थितीचा फायदा झालेले काही खाजगी घटक आणि मर्यादित उत्तरदायित्व व देखरेखीसह ब्लॅक बॉक्समधील कडक सरकारी नियंत्रणावर आधारित आहे.  

तेव्हापासून आतापर्यंत परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर फरक पडला आहे.  

एक ध्रुवीय पाश्चात्य वर्चस्व आणि एंड ऑफ हिस्ट्री यामधून पुढे बहुध्रुवीय जगाकडे वाटचाल सुरू झाली. तसेच मोठ्या टेक कंपन्यांच्या उदयामुळे आपल्या राष्ट्रीय सरकार म्हणजेच राष्ट्र राज्यांसोबतच्या सामाजिक कराराच्या स्वरूपात बदल झाला. यासोबतच, युद्धाच्या स्वरूपातही बदल होऊन थेट संघर्षाचे रूपांतर अदृश्य तांत्रिक हल्ले आणि अस्तित्वासंबंधीच्या जोखमींनी घेतले. याचाच परिणाम म्हणून संरक्षण आणि सामर्थ्य याबाबतच्या आपल्या समजात बदल होत गेला आणि यामुळे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या युगातील मिलिटरी इंडस्ट्रीअल कॉम्प्लेक्सबाबत पुनर्विचार करण्याची एक वैशिष्ट्यपुर्ण संधीही आपल्याला प्राप्त झाली आहे.

एकध्रुवीय पाश्चात्य वर्चस्व आणि एंड ऑफ हिस्ट्री यामधून पुढे बहुध्रुवीय जगाकडे वाटचाल सुरू झाली. तसेच मोठ्या टेक कंपन्यांच्या उदयामुळे आपल्या राष्ट्रीय सरकार म्हणजेच राष्ट्र राज्यांसोबतच्या सामाजिक कराराच्या स्वरूपात बदल झाला.

संरक्षण आणि नविन उपक्रम

AI बाबत आपल्याला असलेली माहिती एकतर विज्ञान कथा असलेल्या पुस्तकांतून किंवा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तयार करण्यात आलेल्या डिक्रिप्शन टेक्नॉलॉजीमधून आलेली आहे. विज्ञान कथांमध्ये कृतीपेक्षा प्रेरणेला अधिक महत्त्व दिले जाते व आजची AI प्रणाली डिक्रिप्शन टेक्नॉलॉजीवर आधारलेली आहे. डिक्रिप्शन टेक्नॉलॉजीवर आधारित नाविन्यपुर्ण उपक्रमांचे श्रेय ॲलन टर्निंग, मारर्विन मिन्स्की आणि जॉन मॅककथी यांना दिले जाते. मिन्स्की हे युएस नेव्हीमध्ये तर मॅककथी हे युएस लष्करामध्ये कार्यरत होते. तसेच टर्निंग यांचे बहुतांश संशोधन ब्रिटीश सरकार आणि संरक्षण खात्याद्वारे नियंत्रित केले जात असे.

येथे संरक्षण आणि सुरक्षा या बाबींचे आकलन हार्ड पावर आणि लढाऊ सज्जता यांच्या दृष्टिकोनातून केले जाते. तसेच एखादा विशिष्ट समुदाय, देश किंवा विचारधारा यांच्याकडे शत्रु म्हणून पाहिले जाते व हिंसेकडे सत्ता टिकवून ठेवण्याचे आणि ‘शत्रू’ला निष्प्रभ करण्याचे साधन म्हणून पाहिले जाते. आयसेनहॉवर यांच्या म्हणण्यानुसार, बहुतेकदा राजकीय अभिजन वर्गाकडून शत्रूची निर्मिती केली जाते. यांचाच फायदा खासगी घटकांना नफा मिळवण्यासाठी होतो व त्याबदल्यात हे घटक सत्ता टिकवून ठेवण्यासाठी अभिजन वर्गाला पाठिंबा देतात.  

बहुतेक सुरुवातीच्या नवकल्पकांसाठी आणि तंत्रज्ञांसाठी, सर्वसाधारणपणे सरकारे आणि विशेषत: लष्करे यांच्याकडून फंडिंग करण्यात आले. नवीन तंत्रज्ञान तयार करण्यासाठीच्या सँडबॉक्सचे पहिले प्रदाता म्हणूनही सरकार आणि लष्करांकडे पाहिले जाते. यांनी एका देशाच्या नागरिकांना 'शत्रू' राष्ट्र, समुदाय किंवा लोकांच्या जिवीताच्या बदल्यात संरक्षित करण्यासाठी तंत्रज्ञान निर्मितीला प्रोत्साहन दिले. २०२१ मध्ये जगभरातील सरकारांनी त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या २.६ टक्के (सरासरी) वाटा संशोधन आणि नवकल्पना यावर खर्च केला आहे. असे असले तरी हळूहळू नवोपक्रमाचे प्राथमिक फंडर आता बदलले जात आहेत.

बहुतेक सुरुवातीच्या नवकल्पकांसाठी आणि तंत्रज्ञांसाठी, सर्वसाधारणपणे सरकारे आणि विशेषत: लष्करे यांच्याकडून फंडिंग करण्यात आले. नवीन तंत्रज्ञान तयार करण्यासाठीच्या सँडबॉक्सचे पहिले प्रदाता म्हणूनही सरकार आणि लष्करांकडे पाहिले जाते.

व्यावसायिकरण आणि लोकशाहीकरणाचा हळूहळू मिलाफ होत निर्माण होत असलेल्या नवीन इकोसिस्टममध्ये तांत्रिक नवोपक्रमाचे खाजगीकरण करण्यात येत आहे. यामुळे जगभरातील जीवनाचा दर्जा आणि आयुर्मान यांत सुधारणा होण्यास मदत झाली आहे तसेच अन्न, निवारा आणि शिक्षण यासारख्या मूलभूत गरजांमध्ये सुधारित प्रवेशही सुलभ झाला आहे. आजच्या घडीला, संरक्षण प्रयोगशाळांच्या तुलनेत खाजगी व्यवसायांमधून अधिक तांत्रिक नवकल्पना येत आहेत. यामुळे बहुतेक वेळा सरकारांना नियामकांची भूमिका पार पाडावी लागते. कोविड-१९ लसींची निर्मिती आणि वितरण हे याचे महत्त्वाचे उदाहरण आहे.

संरक्षण व्यवस्थेचा पुनर्विचार करताना

सरकार आणि खाजगी व्यवसाय यांच्या शक्ती संतुलनातील या बदलामुळे आपल्याला संरक्षण क्षेत्राचा पुनर्विचार करण्याची महत्त्वाची संधी मिळाली आहे.

आपल्या देशातील नागरिक आणि राष्ट्र हित यांचे शत्रुपासून संरक्षण करण्याच्या संकुचित विचारधारेमार्फत संरक्षण या संकल्पनेचा अर्थ लावण्यापेक्षा ऑटोमेशन, हवामान बदल, वृद्धत्व आणि रोग तसेच प्रशासनातील आव्हानांपासून सर्व लोकांचे संरक्षण करणे या व्यापक संकल्पनेतून संरक्षण या संज्ञेचा अर्थ लावणे गरजेचे आहे. आजच्या काळात बहुतांश लोकांना क्षेपणास्त्र आणि बॉम्बच्या धोक्यांचा सामना करावा लागत नाही. त्याऐवजी ते उष्णतेच्या लाटा, साथीचे रोग, कर्करोगाचे नवीन प्रकार, आर्थिक असुरक्षितता आणि राजकीय सहभागामधील प्रवेश, यासारख्या आव्हानांशी झगडत आहेत.

आपल्या देशातील नागरिक आणि राष्ट्र हित यांचे शत्रुपासून संरक्षण करण्याच्या संकुचित विचारधारेमार्फत संरक्षण या संकल्पनेचा अर्थ लावण्यापेक्षा ऑटोमेशन, हवामान बदल, वृद्धत्व आणि रोग तसेच प्रशासनातील आव्हानांपासून सर्व लोकांचे संरक्षण करणे या व्यापक संकल्पनेतून संरक्षण या संज्ञेचा अर्थ लावणे गरजेचे आहे.

आजच्या काळात, बहुतेक खाजगी व्यवसाय हे नाविन्यपुर्ण उपक्रमांचा विचार नफ्याचे प्राथमिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून करतात. त्यांचे हे उद्दिष्ट तंत्रज्ञान ज्यांच्यासाठी तयार करण्यात आले आहे असे लोक आणि सरकार यांच्या हितसंबंधांशी विरोधाभासी असते. एक प्रकारे, यामुळे सत्तेचे केंद्रीकरण आणि लोकांचे शोषण ही मिलिटरी इंडस्ट्रिअल कॉम्प्लेक्स समोरील आव्हाने याही यंत्रणेत स्पष्ट दिसून येतात. सरतेशेवटी, मिलिटरी इंडस्ट्रिअल कॉम्प्लेक्स ही बाजार प्रेरित रचना आहे.

'संरक्षण' आणि संरक्षण खर्च यांचा पुनर्विचार करून, आपण मानवी प्रतिष्ठा आणि सुरक्षितता यांचा समावेश असलेली एक नवीन बाजार प्रेरित संरचना तयार करू शकतो.

यामुळे लष्कर आणि संघर्ष नाहिसे होतील असा याचा अर्थ नाही. आपण सर्व क्षेत्रात प्रगती करत असलो तरी युद्ध हे आजही वास्तव आहे हे आपल्याला रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाने दाखवून दिले आहे. खासगी बाजारपेठा आणि खासगी घटक यांनी संरक्षण या संकल्पनेची नवीन व्याख्या स्विकारली तर युद्धाच्या पारंपारिक कल्पनेला छेद देता येईल किंवा पर्याय निर्माण करता येईल.  


वार्या श्रीवास्तव या नेटवर्क कॅपिटल मध्ये प्रोडक्ट आणि गव्हर्नमेंट विभागाच्या उपाध्यक्ष आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.