Expert Speak Raisina Debates
Published on Jun 17, 2024 Updated 0 Hours ago

AI च्या सहाय्याने शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत प्रगती साध्य करता येऊ शकेल, मात्र त्याचा विकास व उपयोजन जबाबदारीने आणि नैतिकतेने करायला हवे.

AI च्या मदतीने शाश्वत विकासाला गती देण्याचे प्रयत्न!

संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांद्वारे (SDGs) निर्धारित केलेल्या अजेंडा २०३० मध्ये– दारिद्र्य निर्मूलन, पृथ्वीचे संरक्षण आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासारखी सध्याच्या जागतिक स्तरावर भेडसावणारी अभूतपूर्व आव्हाने आहेत. कोविड-१९ साथीमुळे विषमता वाढली आहे, अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे आणि आरोग्य सेवा व्यवस्थेवर ताण आला आहे. भौगोलिक घटकांवर आधारित आंतरराष्ट्रीय संबंधांत उद्भवलेल्या संघर्षांमुळे चित्र अधिक गुंतागुंतीचे बनले आहे,  आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या आणि समान संसाधनाच्या वाटपात अडथळा येतो. या संदर्भात, उर्वरित कालमर्यादेत शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नेहमीच्या पद्धतींत मोठा बदल करणे आवश्यक आहे- या संदर्भातील प्रगतीला गती देण्याकरता नाविन्यपूर्ण उपायांची निकड आहे. या संदर्भात, शाश्वत विकासाचा पाठपुरावा करण्यासाठी AI हा सद्य परिस्थितीत मोठा परिणाम घडवणारा घटक बनण्याची क्षमता असलेले एक शक्तिशाली साधन ठरत आहे.

शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी AI

AI मुळे अनेक लाभ मिळतात, ज्याचा उपयोग विविध क्षेत्रांतील शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये प्रगती साधण्यासाठी केला जाऊ शकतो. मोठ्या प्रमाणातील डेटाचे विश्लेषण करण्याच्या, नमुने ओळखण्याच्या आणि कामे ऑटोमेट करण्याच्या क्षमतेसह AI मुळे जटिल आव्हानांना तोंड देण्याची अफाट क्षमता प्राप्त होते. खालील तक्त्यात तपशील नमूद केल्यानुसार, भागधारक संसाधनांचे कमाल वाटप करू शकतात, निर्णयक्षमता वाढवू शकतात आणि AI च्या क्षमतांचा फायदा घेऊन शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीचा वेग वाढवू शकतात.

AI मुळे अनेक लाभ मिळतात, ज्याचा उपयोग विविध क्षेत्रांतील शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये प्रगती साधण्यासाठी केला जाऊ शकतो. मोठ्या प्रमाणातील डेटाचे विश्लेषण करण्याच्या, नमुने ओळखण्याच्या आणि कामे ऑटोमेट करण्याच्या क्षमतेसह AI मुळे जटिल आव्हानांना तोंड देण्याची अफाट क्षमता प्राप्त होते.

सारणी १: शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत प्रगती साधण्यातील AI ची भूमिका

 

विकासाचे लक्ष केंद्रित असणारी बाब

शाश्वत विकास उद्दिष्टे

AI ची भूमिका

डेटा विश्लेषण आणि निर्णयक्षमता

विविध शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत परिणामकारक निर्णय घेणे हे अचूक आणि वेळेवर उपलब्ध होणाऱ्या डेटावर अवलंबून असते.

AI अल्गोरिदम नमुने, कल आणि अंतर्दृष्टी ओळखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण करतो, जे शाश्वत विकास उद्दिष्टांचे निरीक्षण आणि अंमलबजावणीकरता महत्त्वाचे आहे.

दारिद्र्य निर्मूलन

शाश्वत विकास उद्दिष्ट- १  चे उद्दिष्ट सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे हे आहे.

AI गरिबीत खितपत पडलेला भाग ओळखू शकतो, आर्थिक चढ-उतारांचा अंदाज लावू शकतो आणि असुरक्षित कुटुंबांसाठीचे सहाय्यकारी कार्यक्रम विकसित करू शकतो. AI-संचालित चॅटबॉट्स आर्थिक साक्षरता प्रशिक्षण देऊ शकतात आणि ज्यांना आर्थिक सेवांमध्ये प्रवेश नाही, त्यांना प्रवेश उपलब्ध करून देऊ शकतात.  काही अंदाजानुसार, २०३० सालापर्यंत AIचे जागतिक अर्थव्यवस्थेत १५ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त योगदान असेल.

आरोग्य सेवांचे वितरण

शाश्वत विकास उद्दिष्ट- ३ निरोगी जीवन सुनिश्चित करण्यावर आणि सर्वांचे कल्याण वृद्धिंगत करण्यावर लक्ष केंद्रित करते.

वैद्यकीय निदान आणि औषधांच्या शोध घेण्यात मदत करण्यापासून, उपचार योजना व्यक्तिनिहाय देणे व पुनरावृत्तीच्या कामांचे ऑटोमेटिंग करणे आणि आरोग्य सेवा वितरण सुधारणे यासाठी  AI एक महत्त्वाची संधी प्रदान करते.  AI च्या मदतीने चालणारी साधने रोगनिदान लवकर करण्यासाठी वैद्यकीय प्रतिमांचे विश्लेषण करू शकतात, दुर्गम भागात आभासी सल्ला देऊ शकतात आणि दीर्घकालीन आजारांचे दूरस्थपणे निरीक्षण करू शकतात. कॉग्निटिव्ह रोबोटिक्सद्वारे प्रीऑपरेटिव्ह मेडिकल रेकॉर्डमधील डेटा थेट ऑपरेशनल डेटाशी विलीन करता येतो. प्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना त्यांच्या उपकरणाच्या अचूकतेत सुधार करण्यास मदत होते. या प्रगतीमुळे केवळ शस्त्रक्रियेचे परिणाम सुधारतात, असे नाही तर विविध शल्यचिकित्सा वैशिष्ट्यांमध्ये AIच्या वापरावरचा विश्वास वाढतो. अॅक्सेंचरचा अभ्यास असे सुचवतो की, AI च्या वापरामुळे हेल्थकेअर उत्पादकता ४० टक्क्यांपर्यंत सुधारू शकते, ज्यामुळे सर्वांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळू शकते.

शिक्षण

शाश्वत विकास उद्दिष्ट- ४ हे सर्वांसाठी सर्वसमावेशक आणि समान दर्जाचे शिक्षण सुनिश्चित करणे आहे.

 

AI-संचालित शिकवणी व्यवस्था अध्ययनाचे अनुभव व्यक्तिगत करू शकतात, वैयक्तिक विद्यार्थ्यांच्या गरजा आणि गती पूर्ण करू शकतात. शिक्षणातील तफावत ओळखण्यासाठी आणि लक्ष्यित हस्तक्षेप प्रदान करण्यासाठी AI विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या डेटाचे विश्लेषण करू शकते. याव्यतिरिक्त, AI च्या मदतीने भाषांतर साधनांद्वारे सर्वसमावेशक शिक्षण सर्वदूर नेण्यासाठी, भाषेतील अडथळे ओलांडून ज्ञानाची देवाणघेवाण सुलभपणे होऊ शकते.

पर्यावरणीय शाश्वतता

अनेक शाश्वत विकास उद्दिष्टे स्वच्छ पाणी, स्वच्छ ऊर्जा आणि हवामान कृती या संदर्भातील पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण करतात.

हवामानाच्या नमुन्यांचा अंदाज घेण्यासाठी, जंगलतोडीचा मागोवा घेण्यासाठी आणि संसाधन व्यवस्थापन पद्धती जुळवून घेण्यासाठी AI द्वारे पर्यावरणीय डेटाचे विश्लेषण करता येते. AI-च्या सहाय्याने काम करणाऱ्या प्रारूपांमुळे हवामान बदल कमी करता येऊ शकतो आणि हवामान बदल कमी करणारी प्रभावी धोरणे विकसित करण्यात मदत होऊ शकते.

शेतीत अचूकता

शाश्वत विकास उद्दिष्ट- २ अन्न सुरक्षा साध्य करण्यावर आणि शाश्वत शेतीला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करते.

स्मार्ट फार्मिंगसारख्या AI तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना कमाल उत्पादन घेणे आणि संसाधनांचा वापर कमी करणे, अन्न सुरक्षा वाढवणे शक्य होते.

नाविन्यपूर्णतेचे नेटवर्क





शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय आणि जागतिक सहयोग आवश्यक आहे.

AI संशोधन व विकासाला समर्थन देतो आणि तज्ज्ञांना व समुदायांना जोडणाऱ्या व्यासपीठाद्वारे सहयोग सोपा करतो.

माहिती सर्वसमावेशकपणे उपलब्ध होणे

उद्योग, नावीन्य आणि पायाभूत सुविधांसारखी शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाची उपलब्धता सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे.

डिजिटल अर्थव्यवस्थेत सहभाग वाढवून AI नैसर्गिक भाषा प्रक्रिया आणि उच्चार ओळख करून सर्वसमावेशक तंत्रज्ञान तयार करते.

शहरी नियोजन, आपत्ती प्रतिसाद आणि लवचिकता

शाश्वत विकास उद्दिष्ट- ११ शहरे आणि मानवी वसाहती सर्वसमावेशक, सुरक्षित, लवचिक आणि शाश्वत बनविण्यावर लक्ष केंद्रित करते.

AI च्या मदतीने रहदारी सुरळीत करता येते, इमारतींमध्ये ऊर्जा कार्यक्षमता सुधारता येते आणि कचऱ्याची विल्हेवाट अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करता येऊ शकते. AI-चालित सिम्युलेशन शहरी नियोजकांना शाश्वत शहरांची रचना करण्यात मदत करू शकते, जे हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींकरता लवचिक आहेत. AI-चालित स्मार्ट ग्रिड इमारतींमधील ऊर्जेचा वापर कमी करू शकतात, शहरांसाठी अधिक शाश्वत भविष्याकरता योगदान देऊ शकतात.

आर्थिक विकासासाठी कमाल पुरवठा साखळी

शाश्वत विकास उद्दिष्ट- ८ शाश्वत, सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकास आणि सर्वांसाठी सभ्य कामाला प्रोत्साहन देणे हे आहे.

AI मुळे पुरवठा साखळी कमाल होते, अकार्यक्षमता कमी होते आणि मागणीतील चढ-उतारांचा अंदाज येतो, आर्थिक विकासाला आणि जबाबदार उत्पादनाला सहाय्य मिळते.

स्रोत: लेखक स्वतः; एकाहून अधिक स्त्रोतांचा डेटा

AI इकोसिस्टीमला चालना देणे

विशिष्ट विकासात्मक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या क्षमतेच्या पलीकडे, AI शाश्वत विकासाच्या पाठपुराव्यात सहकार्याला प्रोत्साहन देते. संशोधक, विकासक, व्यवसाय आणि धोरणकर्ते यांचे नेटवर्क एकत्रितपणे काम करणाऱ्या AI इकोसिस्टीमची निर्मिती सोपी करून- AI प्रगतीला गती देऊ शकते. ही इकोसिस्टीम डेटा, कौशल्य आणि संसाधने शेअर करू शकतात, ज्यामुळे शाश्वत विकास आव्हानांसाठी नव्या AI-शक्तीवर चालणारे उपाय विकसित होतात. यासाठी ‘डिजिटल डिवाइड’आवश्यक आहे- माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान उपलब्ध असलेले आणि ज्यांना हे तंत्रज्ञान उपलब्ध नाही, यांच्यातील तफावत- पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल साक्षरता प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान किफायतशीर दरात उपलब्ध असणे याद्वारे कमी करणे आवश्यक आहे.

विशिष्ट विकासात्मक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या क्षमतेच्या पलीकडे, AI शाश्वत विकासाच्या पाठपुराव्यात सहकार्याला प्रोत्साहन देते.

शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये प्रगती साधण्याची प्रचंड क्षमता AI मध्ये असताना, त्याचा विकास आणि उपयोजन जबाबदारीने आणि नैतिकतेने साधायला हवे. पक्षपाती डेटावर आधारित AI अल्गोरिदम विद्यमान आव्हाने कायम ठेवू शकतात. विविध डेटासेटचा वापर करून आणि संपूर्ण रचनाप्रक्रियेत निष्पक्षता, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि मानवी हक्क यांसारख्या नैतिक बाबींचा समावेश करून AI विकासामध्ये निष्पक्षता आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे.

शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याची मोठी क्षमता AI मध्ये असताना, त्याचा विकास आणि उपयोजन जबाबदारीने आणि नैतिकतेने करायला हवे. पक्षपाती डेटावर आधारित AI अल्गोरिदम सध्याची आव्हाने कायम ठेवू शकतात.

शाश्वत विकास उद्दिष्टांवरील AI चा सकारात्मक प्रभाव वाढवण्यासाठी बहु-भागधारक दृष्टिकोन अंगिकारणे आवश्यक आहे. शाश्वत विकासाकरता AI उपाय विकसित करण्यासाठी विविध सरकारांनी, व्यवसायांनी, नागरी संस्थांनी आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. यासाठी मुक्त संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सामूहिक कृती आवश्यक आहे. शाश्वत विकासासाठी AI च्या संशोधनाला आणि विकासाला पाठिंबा देण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी गुंतवणुकीचीही आवश्यकता आहे- AI संशोधन, पायाभूत सुविधा विकास आणि डिजिटल साक्षरता कार्यक्रमांसाठी निधी महत्वाचा आहे. अखेरीस, अविकसित अर्थव्यवस्थांमध्ये AI व्यावसायिकांकरता प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे आणि संशोधन सहयोगांना चालना मिळायला हवी. शाश्वत विकासासाठी AI तैनात करण्याकरता त्यांचे कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी क्षमता-निर्माण उपक्रमांची आवश्यकता आहे.


सौम्य भौमिक ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये असोसिएट फेलो आहेत.

आरती महतो ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये रिसर्च इंटर्न आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Soumya Bhowmick

Soumya Bhowmick

Soumya Bhowmick is an Associate Fellow at the Centre for New Economic Diplomacy at the Observer Research Foundation. His research focuses on sustainable development and ...

Read More +
Arti Mahato

Arti Mahato

Arti Mahato is a Research Intern at the Observer Research Foundation. ...

Read More +