Date: Jun 09, 2020
This webinar will be conducted in Marathi, 6:00 p.m. IST onwards. Please note that registration is on a first come, first served basis. If your registration is successful, you will receive a confirmation email and a link through which you can join the webinar.
The coronavirus pandemic has underlined the irresponsible behaviour and false lifestyle human society has been observing. Across the globe, stakeholders from various sectors of society have been discussing the need to transform lifestyle and propagate environmental awareness. Join us in this webinar to understand the problem and seek the possible ways and options.

Speaker

Atul Deulgaonkar, environmentalist and author
माणसाने आपल्या जीवनशैलीत केलेल्या मनमानी बदलांमुळे आणि त्यामुळे निसर्गाकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज आपण कोरोनाच्या संकटात फसलो आहोत, हे मत आता सर्वमान्य होऊ लागले आहे. ही साथ एवढी मोठी आहे की, आता इतिहासाच्या पुस्तकात आधुनिक इतिहासाची विभागणी ही कोरोनापूर्व काळ आणि कोरोनानंतरचा काळ अशी होईल, असे म्हटले जाऊ लागले आहे. माणूस असाच बेबंद वागत राहिला, तर हे संकट उद्या माणसाच्या अस्तित्वावरच घाला घालेल, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे निसर्गाने आपले खरे रूप दाखवून, माणसाला त्याची जागा दाखवून दिली. त्यामुळे माणसासाठी ही सावध होण्याची वेळ आहे. निसर्गाच्या अवाढव्य जगाचा माणूस एक भाग असून, त्याने निसर्गाशी जुळवून घेऊन कसे वागायचे हे नव्याने शिकावे लागणार आहे. मायबाप निसर्गासोबत माणसाने एक बुद्धिमान प्राणी म्हणून आता तरी कसे वागावे, हे समजून घेणे, हे कधी नव्हे एवढे आज महत्त्वाचे ठरले आहे. हा विषय समजून घेण्यासाठी या वेबिनारमध्ये अवश्य सहभागी व्हा.

व्याख्यात्यांविषयी

अतुल देऊळगावकर हे पर्यावरणाचे अभ्यासक, कार्यकर्ते असून गेली ते सातत्याने या विषयामध्ये लेखन करत आहेत. लॉरी बेकर यांचे चरित्र, ग्रेटाची हाक: तुम्हाला ऐकू येतेय ना?, स्वामीनाथन-भूकमुक्तीचा ध्यास ही त्यांची पुस्तके विशेष गाजली आहे. पर्यावरणासंदर्भात लोकजागृती व्हावी, म्हणून त्यांनी अनेक व्याख्यानेही दिली आहेत.